घरमुंबई'सुप्त क्षयरोग’प्रसाराच्या प्रतिबंधासाठी महापालिकेचा विशेष उपक्रम

‘सुप्त क्षयरोग’प्रसाराच्या प्रतिबंधासाठी महापालिकेचा विशेष उपक्रम

Subscribe

मुंबई महापालिकेने क्षयमुक्त मुंबईसाठी रुग्णांच्या जास्त संपर्कातील व्यक्तिंची मोफत आय.जी.आर.ए. चाचणी करण्याचा उपक्रम नुकताच सुरू करण्यात आला आहे.यासंदर्भातील माहिती मुंबई महापालिका आरोग्य खात्याच्या विभाग प्रमुख तथा कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.

मुंबईत ६० टक्के झोपडपट्टी आहे. दाट लोकवस्ती असल्याने या ठिकाणी जवळच्या संपर्ककातून संबंधित व्यक्तींना क्षयरोगाची लागण झपाट्याने होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे रुग्णसंख्येतही जास्त वाढ होते. झोपडपट्टीत क्षयरोगाच्या प्रसाराला आळा घालणे कठीण होते. यास्तव आता पालिका आरोग्य खात्याने ‘सुप्त क्षयरोग’प्रसाराच्या प्रतिबंधासाठी विशेष उपक्रम नुकताच सुरू केला आहे. या उपक्रमानुसार, ज्यांच्या थुंकीमध्ये क्षयरोगाचे जंतू आढळून आले आहेत, अशा क्षयरुग्णाच्या जास्त संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची आय.जी.आर.ए. ही अत्याधुनिक वैद्यकीय चाचणी मोफत करण्यात येणार आहे. या चाचणीबाबत महत्त्वाची बाब म्हणजे एखाद्या सुदृढ व्यक्तिला क्षयरोगाची लक्षणे नसताना देखील क्षयरोगाचे संक्रमण झाले असल्यास, त्याची खातरजमा करण्याकरीता आय.जी.आर.ए. चाचणी केली जाते. त्यामुळे क्षयरोग प्रसाराला रोखण्यात पालिकेला यश मिळण्याची शक्यता अधिक वाढते.

- Advertisement -

आय.जी.आर.ए. वेैद्यकीय चाचणीचा अहवाल हा ‘सुप्त – क्षयरोग’ यासाठी बाधित नसल्याचे निदर्शनास आल्यास सदर व्यक्तिला क्षयरोगाचे संक्रमण नसल्याची खातरजमा होते. तथापि, अधिक प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून क्षयरोग बाधेबाबत सदर व्यक्तिची त्या पुढील २ वर्षे पर्यंत नियमितपणे पाठपुरावा तपासणी करण्यात येणार आहे. या प्रकारची पाठपुरावा तपासणी प्रत्येक ६ महिन्यातून एकदा यानुसार करण्यात येईल.

जर आय.जी.आर.ए. वैद्यकीय चाचणीचा अहवाल हा ‘सुप्त – क्षयरोग’ यासाठी बाधित असल्याचे निदर्शनास आल्यास सदर व्यक्तिला ‘क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचार’ हे आठवड्यातून एकदा व एकूण १२ आठवडे दिले जातील. तसेच क्षयरोग बाधेच्या अनुषंगाने पुढील २ वर्षे त्या व्यक्तिचा नियमितपणे पाठपुरावा केला जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -