घरट्रेंडिंगविमानात बॉम्ब असल्याचा प्रवाशाचा दावा; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, तपासणीवेळी आले सत्य समोर

विमानात बॉम्ब असल्याचा प्रवाशाचा दावा; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, तपासणीवेळी आले सत्य समोर

Subscribe

विमानने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने विमान बॉम्ब असल्याचा केला. विमानात बॉम्ब असल्याचे समजताच इतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर हे विमान सुरक्षित लॅण्ड करण्यात आले. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले.

विमानने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने विमान बॉम्ब असल्याचा केला. विमानात बॉम्ब असल्याचे समजताच इतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर हे विमान सुरक्षित लॅण्ड करण्यात आले. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले. पोलिसांनी सर्व प्रवाशांना विमानाबाहेर काढले. त्यानंतर बॉम्ब निकामी पथकाने उड्डाणाची बारकाईने तपासणी केली. मात्र, या तपासणीदरम्यान विमानात काहीच सापडले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. (passenger claimed that there was a bomb in plane Patna Airport indigo flight)

पाटणा (Patna) विमानतळावरून (Airport) इंडिगो फ्लाइट क्रमांक 6E2126 टेक ऑफ करत होते. त्यावेळी ऋषी चंद सिंग नावाच्या प्रवाशाने प्रवाशाने विमानात बॉम्ब असल्याचा दावा केला. त्यानंतर उड्डाण रद्द करून संपूर्ण विमानाचा शोध घेण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी ऋषीचंद सिंग याला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी केली जात आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, उतरवलेलं विमान आज सकाळी रवाना होणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, बॉम्ब निकामी पथकाने उड्डाणाची बारकाईने तपासणी केली असून, फ्लाइटमध्ये काहीही सापडले नसले, तरी खबरदारी म्हणून विमान रद्द करून सर्व प्रवाशांना विमानातून बाहेर काढले.

विमानात बॉम्ब असल्याचा दावा करणारा प्रवासी ऋषीचंद सिंग हा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचा विमानतळ पोलिसांनी दावा केला आहे. शोध मोहीम पूर्ण झाल्यानंतर उड्डाणाला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.

- Advertisement -

दुबई-कोची विमानासा दुसरीकडे वळवले

एअर इंडियाच्या दुबई-कोची विमानासा दुसरीकडे वळवण्यात आले आहे. वैमानिकाच्या तक्रारीनंतर या विमानाचे मुंबईत सुरक्षित लँडिंग करण्यात आले. एअर इंडियाचे ड्रीमलायनर विमान दुबईहून कोचीला जात होते. यावेळी वैमानिकाने केबिनमधील दबाव कमी झाल्याचे’ सांगितल्यानंतर ते मुंबईकडे वळवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.


हेही वाचा – वैमानिकाच्या तक्रारीनंतर एअर इंडियाचे दुबई-कोची विमान दुसरीकडे वळवले, मुंबईत सुरक्षित लँडिंग

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -