घरमुंबईआठ हजार धावपटूंनी दिली शहिदांना मानवंदना

आठ हजार धावपटूंनी दिली शहिदांना मानवंदना

Subscribe

मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या दशकपुर्ती वर्षात त्यावेळी शहीद झालेले जवान आणि पोलसांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या मानवंदना शर्यतीत ८ हजार धावपटूंनी सहभाग घेतला.

मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या दशकपुर्ती वर्षात त्यावेळी शहीद झालेले जवान आणि पोलसांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या मानवंदना शर्यतीत ८ हजार धावपटूंनी सहभाग घेतला. आयडीबीआय फेडरलल लाईफ इंन्शुरन्सने ‘द सी हॉक्सच्या’ सहकार्याने आयोजित केलेल्या या मानवंदना दौडला मुंबईतील एनएससीआयमधून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. सर्व वयोगटातील मुंबईकरांनी यामध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि पब्लिक कंर्सन फॉर गव्हर्नन्स ट्रस्ट या सेवाभावी संस्थेचे संस्थापक जुलिओ रिबीरो, आंतरराष्ट्रीय टेनिसपटू पुरव राज, सिने अभिनेत्री तारा शर्मा, जीआोसी लेफ्टनंट जनरल पराशर, नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाचे प्रेसिंडेंट जयंतीलाल शहा, दौडच्या संयोजिका मयांक व्यास सिंग आदी, आयडीबीआय फेडरल लाईफ इंन्शुरऩ्सचे सीएमओ रमण कार्तिक इत्यादी मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी २१ किलोमीटर, १० किलोमीटर आणि ३ किलोमीटर अंतराच्या पळण्याची शर्यत आयोजित करण्यात आली होती.

कर्करोगावर मात करणाऱ्या रश्मी यांनीही घेतला सहभाग

या दौडच्याआधी सेलिब्रेटी फिटनेस ट्रेनर डॉ. मिकी मेहता आणि त्यांच्या सहकार्‍यांनी दौडमध्ये सहभागी झालेल्या धावपटूंचे वॉर्मिंग अप सेशन घेऊन त्यांना या दौडासाठी शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या तयार केले. याशिवाय कर्करोगावर मात करणार्‍या धावपटू रश्मी कुमार मेहरा, त्यांचा मुलगा आणि फिटनेस ट्रेनरव बॉडी बिल्डर निशीरीन पारिख यांना या दौडसाठी प्रोत्साहीत केले. मानवंदना दौडच्या सुरुवातीला आणि समाप्तीला भारतीय सेनादलाच्या शिख रेजीमेंटच्या पाईप आणि ब्रास बॅण्ड पथकाने स्वागत केले. दौड संपल्यानंतर द कॅथेड्रल आणि जॉन कॅनन स्कुलच्या पथकाने संगीताद्वारे २६/११ च्या शहीदांना आदरांजली अर्पण केली. दहशतवादाच्या विरोधात एकजुटीने उभे राहण्याच्या इराद्याने या मानवंदना दौडमध्ये भारतीय सेनादलाचे आणि मुंबई पोलिसांचे जवान विविध वयोगटातील धावपटूंसह सहभागी झाले होते. ही मानवंदना दौड यशस्वीपणे पुर्ण करणार्‍या धावपटूंना एनसीसी कॅडेटच्या हस्ते पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

- Advertisement -

“मानवंदना दौडमध्ये सुमारे आठ हजाराहून अधिक धावपटूंनी सहभाग घेत मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मानवंदना देण्यासाठी दिलेला प्रतिसाद पाहुन आम्ही भारावून गेलो. या १० व्या स्मृतीदिनी शहिदांचे स्मरण करुन आम्ही एकत्रितपणे, धिराने पुढे वाटचाल करु.”- आयडीबीआय लाईफ इंन्शुरन्सचे सीएमओ रमण कार्तिक 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -