घरCORONA UPDATEमुंबई, दिल्लीसह या '७' राज्यात कोरोनाचा संसर्गवेग वाढला, चोवीस तासात ४९ जणांचा...

मुंबई, दिल्लीसह या ‘७’ राज्यात कोरोनाचा संसर्गवेग वाढला, चोवीस तासात ४९ जणांचा मृत्यू

Subscribe

देशात अचानक कोरोनाचा संसर्ग वाढला असून गेल्या २४ तासात कोरोनाचे १६५६१ सक्रिय रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या चोवीस तासात ४९ जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात अचानक कोरोनाचा संसर्ग वाढला असून गेल्या २४ तासात कोरोनाचे १६५६१ सक्रिय रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या चोवीस तासात ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. दररोजचा रुग्णांचा पॉझिटीव्हिटी रेट ५.४४ टक्क्यांवर पोहचला आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी सर्व राज्यांना कोरोना नियमावलीच्या सूचना पाळण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मोठ्या सोहळ्यांवर बंदी घालण्याबरोबरच कोरोना गाईडलाईनचे पालन करण्याच्या सूचनाही केंद्राने राज्य सरकारला दिल्या आहेत.

गेल्या अडीच वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत असून आतापर्यंत देशात कोरोनामुळे ५,२६,९२८ जणांचा मृत्यू झाला आहे. २०२० आणि २०२१ मध्ये कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग हा महाराष्ट्र आणि केरळमध्ये होता. आजही पुन्हा एकदा केरळमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असून गेल्या २४ तासात केरळमध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत गुरुवारी कोरोनाचे २,७२६ रुग्ण आढळले असून ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर याआधी दिल्लीत ३१ जानेवारीपर्यंत २,७७९ रुग्णसंख्या होती. दिल्लीचा पॉझिटीव्हीटी रेट ६.२० टक्के होता. त्यावेळी दिल्लीत ३८ जणांचा मृत्यू झाला होता.

- Advertisement -

कोणत्या राज्यात किती रुग्णसंख्या?

गेल्या चोवीस तासात दिल्लीत २,७७९ , महाराष्ट्रात १८७७ रुग्णसंख्या, पश्चिम बंगालमध्ये ५९८ यूपीमध्ये १०१८, केरळमध्ये १२१२, कर्नाटकात १६९१, ओदिशामध्ये ५३०, तामिळनाडूमध्ये ८९२, राजस्थान ६५८, गुजरातमध्ये ५५२ रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत ६८३ रुग्ण सापडले आहेत.

- Advertisement -

दिल्लीत आणि मुंबईत ओमिक्रॉनचे रुग्ण आहेत. तर दिल्लीत BA.4 आणि BA.5 सब व्हेरियंट सापडले आहेत. या विषाणूचा संसर्गाचा वेग सर्वाधिक आहे. BA.5 हा दुसऱ्या व्हेरियंटच्या तुलनेत वेगाने पसरणारा आहे. तसेच लसीकरण झालेल्यांना तसेच बूस्टर डोस घेतलेल्यांना देखील या व्हेरियंटची लागण होत आहे. यामुळे दिल्लीत सार्वजनिक ठिकाणी पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्यात आली आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -