घरताज्या घडामोडीमराठा आरक्षण आंदोलनाचा बुलंद आवाज हरपला; विनायक मेटे यांच्या निधनाने कार्यकर्ते भावूक

मराठा आरक्षण आंदोलनाचा बुलंद आवाज हरपला; विनायक मेटे यांच्या निधनाने कार्यकर्ते भावूक

Subscribe

विनायक मेटे यांच्या अपघातानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली आहे. तसेच, मराठा आरक्षण आंदोलनाचा बुलंद आवाज हरपला, असे म्हणत मेटे यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे निधन झाले आहे. कारच्या भीषण अपघातात त्यांचे निधन झाले. रविवारी सकाळी 5:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. विनायक मेटे यांच्या अपघातानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली आहे. तसेच, मराठा आरक्षण आंदोलनाचा बुलंद आवाज हरपला, असे म्हणत मेटे यांना श्रद्धांजली वाहत आहेत. विनायक मेटे यांच्या निधनाची माहिती मिळताच घटनास्थळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेते प्रविण दरेकर दाखल झाले आहेत.

कोण आहेत विनायक मेटे थोडक्यात?

- Advertisement -

विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते. मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आंदोलनं केली. तसेच, अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते. याशिवाय, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी होते. सर्वप्रथम शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात आमदार राहिले होते. त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य होते.

सहकाऱ्याचा आरोप

- Advertisement -

त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघातात जखमी झाल्यानंतर विनायक मेटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वेळेत मदत मिळाली नाही. जवळपास एक तासाहून अधिककाळ त्यांना मदतीसाठी प्रतिक्षा करावी लागली. उपचारांना उशीर झाल्याने त्यांना जीवाला मुकावे लागल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोप केला आहे.

पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात झाला. आज मराठा समन्वय समितीची बैठक होती. त्यासाठी ते मुंबईकडे येत होते. यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यात ते गंभीररित्या जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे.


हेही वाचा – शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंचे कारच्या भीषण अपघातात निधन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -