घरमुंबईराज्यात महिला सुरक्षित आहेत की नाही?, एकनाथ खडसेंचा गोरेगाव तालुक्यातील प्रकरणात सवाल

राज्यात महिला सुरक्षित आहेत की नाही?, एकनाथ खडसेंचा गोरेगाव तालुक्यातील प्रकरणात सवाल

Subscribe

आज विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृह सुरू होताच 289 नुसार विरोधी पक्षाने स्थगन प्रस्ताव आणला. यावेळी विरोधी पक्षांनी सर्व कामकाज बाजूला ठेऊन चर्चा करण्याची मागणी केली. दरम्यान यावेळी उपसभापतींनी आमदार मनीशा कायंदे यांना बोलण्याची परवानगी दिली.

काय म्हणाल्या मनीशा कायंदे –

- Advertisement -

महाराष्ट्रात जंगलात राहणाऱ्या भगीनी तीच्यावर वाईट पद्धतीने अत्याचार झाले. गोरेगावा तालुक्यातील ही महिला आहे. ती भावाच्या घरी निघाली होती. तीला भूक लागली असता काही लोकांनी तीला अन्न देऊन तीचा उपभोग घेतला. अन्य दोघांनी तीच्यावर अत्याचार केले. यानंतर ती एका धाब्यावर गेली त्यावेळी तीला पोलीस पाटलांनी बघीतले आणि पोलीस ठाण्यात फोन करून लाखणी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्या महिलेला रात्रभर पोलीस ठाण्यात ठेवले होते. त्यानंतर ती महिला निघून गेली याची पोलिसांना माहिती नाही. त्यानंतर सुद्धा त्या महिलेवर अत्याचार झाले. यानंतर आम्ही सदस्या भेटण्यासाठी गेलो असता रुग्णालय प्रशासनाने भेटू दिले नाही.आम्ही हस्तक्षेप केल्यानंतर त्यांनी प्रत्येकाला भेटू दिले. आम्ही मदत देऊ केली असता त्यांनी ती स्वीकरल नाही. सरकारी मदत त्यांना मिळालेली नाही . कारण तीच्याकडे ओळखीचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे मी सभागृहाला या विषयी चर्चा करण्याची मागणी करते अशी विनंती त्यांनी सभागृहाला केली.

एकनाथ खडसे काय म्हणाले –

- Advertisement -

यानंतर आमदार एकनाथ खडसेंनी यावर सभागृहात मागणी केली. ते म्हणाले गोंदीया बलात्कार प्रकरण गंभीर आहे. त्या महिलेवर वारंवार अत्याचार झाला. राज्यात महिला सुरक्षीत आहेत की नाही यावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. राज्यातील कायदा सव्यवस्थेचा प्रश्न आहे. तातडीचं गरज लक्षात घेऊन सभागृहाने चर्चा करावी अशी मागणी त्यांनी केली.

उपसभापतींचे आदेश –

यानंतर लवकरात लवकर चर्चा करण्याचे आदेश उपसभापतींनी दिले. या शिवाय शक्ती कायदा केंद्र सरकार कडे पाठपुरावा करून आनावा असे आदेश निलम गोऱ्हे यांनी दिले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -