घररायगडरायगड संशयित बोट प्रकरणात आर्म अॅक्ट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

रायगड संशयित बोट प्रकरणात आर्म अॅक्ट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

Subscribe

मुंबई – महाराष्ट्रातील रायगड येथील समुद्रकिनारी सापडलेल्या संशयास्पद बोटीप्रकरणी राज्याच्या एटीएसने आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी या संशयास्पद बोटीतून 3 एके 47 आणि काही जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. पोलिसांनी नंतर बोटीतून दोन तलवारी आणि दोन चॉपर (तीक्ष्ण चाकू) जप्त केले. रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर ही बेवारस बोट सापडली. हरिहरेश्वर समुद्रकिनारा मुंबईपासून 200 किमी आणि पुण्यापासून 170 किमी अंतरावर आहे. हरिहरेश्वर किनार्‍यापासून 32 किमी अंतरावर असलेल्या भारदखोलमध्येही एक लाईफ बोट सापडली होती, त्यानंतर दहशतवादी कटाची भीती अधिक गडद झाली आहे.

याबाबत माहिती देताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही बोट ऑस्ट्रेलियन नागरिकाची होती, ती मस्कतहून युरोपला जात होती. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रात बोटीचे इंजिन खराब झाले. आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेऊन पोलीस आणि प्रशासन सतर्क झाले आहे. बोटीतून तीन एके-४७ रायफल सापडल्याचे त्यांनी सांगितले. अर्ध्या तुटलेल्या अवस्थेत, हायटाइडमुळे बोट कोकण किनार्‍याकडे आली. केंद्रीय यंत्रणांना कळवण्यात आले आहे.

- Advertisement -

कोणताही दहशतवादी अँगल समोर आलेला नाही – फडणवीस 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोणत्याही दहशतवादी अँगलची पुष्टी झालेली नाही. महाराष्ट्रात सापडलेल्या या संशयास्पद बोटीमुळे आधी गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर आणि नंतर मुंबईत २६/११च्या संशयित बोटीसारखा दहशतवादी कट रचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही दहशतवादी बोटीतूनच शहराच्या समुद्रकिनाऱ्यावर उतरले होते.

- Advertisement -

या बेवारस बोटीबाबत आतापर्यंत मिळालेली माहिती –

पोलिसांनी दोरीच्या साहाय्याने समुद्राच्या लाटांमधून बोट ओढून किनाऱ्यावर आणली. या बोटीत एका ब्लॅक बॉक्समध्ये 3 एके-47 रायफल आणि काडतुसे सापडली. ही शस्त्रे ज्या बॉक्समध्ये ठेवण्यात आली होती त्यावर नेपच्यून मेरीटाईम सिक्युरिटी असे इंग्रजीत लिहिले होते, असे पोलिसांनी सांगितले. ही कंपनी यूकेची आहे. जप्त केलेल्या कागदपत्रांवरून असे दिसून आले आहे की बोटीचे नाव लेडी हॉन आहे आणि मालक हाना लॉंडर्सगन ही ऑस्ट्रेलियन महिला आहे. तिचे पती जेम्स हॉबर्ट हे बोटीचे कॅप्टन होते. 26 जून 2022 रोजी या बोटीचे इंजिन बिघडले. त्यात उपस्थित लोकांनी हाक मारली. या लोकांची कोरियन नौदलाने सुटका केली. सुटका केल्यानंतर त्यांना ओमानच्या ताब्यात देण्यात आले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -