घरदेश-विदेशसाध्वी बनण्यासाठी लाखो रुपयांच्या नोकरीवर पाणी सोडले

साध्वी बनण्यासाठी लाखो रुपयांच्या नोकरीवर पाणी सोडले

Subscribe

एका तरुणीने साध्वी बनण्यासाठी गूगलची लाखो रुपयांच्या नोकरीवर पाणी सोडले आहे. ही नोकरी सोडून तिने संन्यास स्विकारला आहे. ही तरुणी आता साध्वी बनली आहे.

गूगल कंपनीत नोकरी मिळावी असे कित्येक तरुण-तरुणींचे स्वप्न असते. परंतु, एका तरुणीने साध्वी बनण्यासाठी गूगलची लाखो रुपयांच्या नोकरीवर पाणी सोडले आहे. नोकरी सोडून तिने संन्यास स्विकारला आहे. ही तरुणी आता साध्वी बनली आहे. उत्तर प्रदेशच्या वारणसीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमात ही साध्वी आली होती. राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर वाराणसीमध्ये तीन दिवसांचा अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा – राम मंदिरसाठी अयोध्येच्या साधूंनी घेतली आदित्यनाथ यांची भेट

- Advertisement -

तरुणीने का स्विकारला सन्यास?

या तरुणीचे नाव ब्रम्हवादिनी देवी असे आहे. ही तरुणी दिल्लीच्या एका मोठ्या उद्योगपतीची मुलगी आहे. तिचे दिल्लीमध्ये बालपण गेले आहे. ब्रम्हवादिनीने चार महिन्यांपूर्वी गूगलची नोकरी सोडली आणि सन्यास स्विकारला आहे. वाराणसीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसाच्या धार्मिक कार्यकर्मात ही साध्वी आली होती. या कार्यक्रमात ब्रम्हवादिनी ही सर्वात कमी वयाची साध्वी ठरली आहे. त्यावेळी माध्यमांशी बोलताना साध्वीने सांगितले की, संन्यास घेण्याचे मुख्य कारण अध्यात्म आहे. साध्वी म्हणाल्या की, लहानपणी आपण आई-वडिलांसोबत मंदिरांमध्ये जात असे. काही दिवसांपूर्वूी आपण आईसोबत गुरु मातांच्या भेटीला आलो होतो आणि त्यांनी ईश्वरच्या साधनेसाठी दिलेल्या मार्गदर्शनावर आपण प्रभावित झालो, असे साध्वीने सांगितले.

हेही वाचा – श्रीरामांच्या पुतळ्याला संतमहंतांचा विरोध

- Advertisement -

गूगलमध्ये उच्चभ्रू जीवन होते – साध्वी

साध्वीने सांगितले की, तिच्या आईला नेहमी आपली मुलं अध्यात्माकडे वळावी असे वाटायचे तर वडिलांचा या गोष्टीला विरोध होता. आपण जेव्हा चार महिन्यांपूर्वी सन्यास घेतला त्यावेळी आपल्या वडिलांनी आणि भावाने विरोध केल्याचे साध्वीने सांगितले. परंतु, जेव्हा वडिल आणि भाऊ गुरु मातांच्या दर्शनाला आले तेव्हा त्यांचेही मत बदलले. आपण जेव्हा गूगल कंपनीत नोकरी करत होता तेव्हा उच्चभ्रू आयुष्य जगत होतो, परंतु आता साध्वी झाल्यापासून आपण थंडीच्या दिवसातही एक जोडी कपड्यावर आणि दिवसभर फक्त पाण्यावर राहत आहोत, असे साध्वीने सांगितले आहे.


हेही वाचा – अयोध्येत आज हिंदू विश्व परिषदेची महासभा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -