घरताज्या घडामोडी'या' विमान कंपन्यांच्या तिकीट दरात मोठी कपात

‘या’ विमान कंपन्यांच्या तिकीट दरात मोठी कपात

Subscribe

विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता विमान प्रवास स्वस्त होणार आहे. केंद्र सरकारने विमान तिकिट दरावरील मर्यादा हटवल्या आहेत. त्यामुळे अनेक विमान कंपन्यांनी आपल्या तिकिट दरात कपात केली आहे.

विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता विमान प्रवास स्वस्त होणार आहे. केंद्र सरकारने विमान तिकिट दरावरील मर्यादा हटवल्या आहेत. त्यामुळे अनेक विमान कंपन्यांनी आपल्या तिकिट दरात कपात केली आहे. तिकीट दरात कपात करत अनेक विमान कंपन्या प्रवाशांना विविध ऑफर देत आहेत. दरम्यान, विमान कंपन्यांचा हा निर्णय प्रवाशांसाठी दिलासादायक ठरत आहे. (central government removed the cap on air ticket prices)

नागरी उड्डाण मंत्रालयाने 31 ऑगस्टपासून विमान तिकिट दरावरील मर्यादा हटवली आहे. त्यानंतर भारतीय विमान कंपन्यांच्या तिकीट दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

- Advertisement -

केंद्र सरकारच्या निर्णयानंतर विमान कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढली आहे. त्यांच्यातील स्पर्धेचा देशांतर्गत विमान प्रवाशांना मोठा फायदा होऊ शकतो. अनेक विमान कंपन्या प्रवाशांच्या मागणीनुसार सूट देऊ शकतात, असा अंदाज हवाई प्रवास क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

विमान कंपन्यांच्या ऑफरनुसार, मुंबई ते अहमदाबाद प्रवास केवळ 1,400 रुपयांमध्ये किंवा मुंबई ते बंगळुरू 2,000 रुपये किंवा त्याहूनही कमी किमतीत उड्डाण करू शकणार आहे. याशिवाय, गो फर्स्टच्या विमानाच्या मुंबई ते अहमदाबाद प्रवासासाठी तिकिटाची किंमत अवघी 1,399 रुपये एवढीच आकारली जाणार आहे. याच मार्गावर 9 सप्टेंबरच्या प्रवासासाठी Akasa Air कंपनीचे विमान तिकिट 1,497 रुपये इतके आहे. इंडिगो ही देशांतर्गत सर्वात मोठी विमान कंपनी या मार्गावर 1,609 रुपये इतकी तिकिट ऑफर देत आहे.

- Advertisement -

मुंबई ते बंगळुरूचा विमान प्रवास 2,000 ते 2,200 रुपयांच्या श्रेणीत तिकिट उपलब्ध करण्यात आले आहे. Akasa Air ही नवी विमान कंपनी या मार्गावर 9 सप्टेंबरच्या प्रवासासाठी 1,997 रुपयांचे तिकिट ऑफर करत आहे, तर इंडिगोचे तिकीट 2,208 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.


हेही वाचा – बुलडाण्यात शिवसेनेच्या कार्यक्रमात राडा, शिंदे आणि ठाकरे गट भिडले

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -