वसई- विरार शहर महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामे होऊ नयेत म्हणून प्रभाग समिती ‘सी’, ‘एफ’ व ‘जी’ या प्रभागात बीट चौक्या बसवण्याचा निर्णय आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार यांनी घेतला आहे. या प्रभागांतील चौक्यांवर देण्यात आलेल्या मोबाईल नंबरला प्रसिद्धी देण्यात येणार असून नागरिकांनी अतिक्रमणांबाबत असलेल्या तक्रारी सदरच्या संपर्क क्रमांकावर कळवायच्या आहेत. प्रभाग समिती ‘सी’, ‘एफ’ व ‘जी’ येथे अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याच्या तक्रारी आहेत. त्यात महापालिका अधिकारी, कर्मचार्यांचा सहभाग असल्याचेही अनेकदा दिसून आलेले आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामांवर आळा घालण्यासाठी सुरुवातीला प्रत्येकी दोन-दोन बीट चौक्या बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चौक्यात तीन पाळ्यांमध्ये कर्मचार्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. तसेच या ठिकाणी एमएसएफ गार्डच्याही नियुक्त्या करण्यात येणार आहेत.बीट चौक्यांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचार्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यात येणार असून आवश्यक त्या नोंदी करण्यासाठी रजिस्टर, मोबाईल व लॅण्डलाईन फोन, कार्यालयात आवश्यक ते फर्निचर, पिण्याच्या पाण्याची सुविधा अशा सर्व सुविधा देण्यात येणार आहेत. जेणेकरून तात्काळ कारवाई करणे सुलभ होणार आहे. त्याचप्रमाणे या चौक्यांमध्ये कर्मचार्यांची हालचाल नोंदवहीसुद्धा ठेवण्यात येणार आहे. कर्मचार्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात फिरून सुरु असलेल्या अवैध बांधकामांचा अहवाल सहाय्यक आयुक्तांना सादर करावयाचा आहे. सहाय्यक आयुक्तांनी चालू अनधिकृत बांधकामे तात्काळ निष्कासीत करावयाची असून बांधकामांना नोटीस देतानाच न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
अतिक्रमण झालंय?बीट चौक्यांना संपर्क करा
written By Roshan Chinchwalkar
Vasai
या प्रभागांतील चौक्यांवर देण्यात आलेल्या मोबाईल नंबरला प्रसिद्धी देण्यात येणार असून नागरिकांनी अतिक्रमणांबाबत असलेल्या तक्रारी सदरच्या संपर्क क्रमांकावर कळवायच्या आहेत.
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -