घरगणेशोत्सव 2022Ganesh Visarjan 2022 : मुंबई, पुण्यातील अनेक वाहतुक मार्गांमध्ये बदल; जाणून घ्या...

Ganesh Visarjan 2022 : मुंबई, पुण्यातील अनेक वाहतुक मार्गांमध्ये बदल; जाणून घ्या अपडेट्स

Subscribe

महाराष्ट्राचे लाडके आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाचे आज विसर्जन होत आहे. दहा दिवसांच्या मुक्कामानंतर अखेर अनंत चतुर्थीला राज्यभरातील घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे. विशेषत: मुंबई, पुण्यात गणपती विसर्जन सोहळ्यानिमित्त मोठी गर्दी पाहायला मिळते. या दृष्टीने आता मुंबईसह पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. मुंबईचा विचार केल्यास मुंबईतील एकूण 74 रस्ते बंद विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आले आहेत. तर 54 रस्त्यांवरील वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. या रस्त्यांवर अवजड वाहनांना सुद्धा प्रवेश बंदी आहे. तर 114 ठिकाणी गाड्या पार्क करण्यास मनाई करण्यात आली आहे.

मुंबईत तब्बल 12 हजार सार्वजनिक मंडळ आहेत. यात दीड लाखांहून अधिक घरगुती मुर्त्यांचे विसर्जन गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थीदरम्यान केले जाते. यासाठी गिरगाव, दादर, वरळी, माहीम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, अक्सा, मार्वे खाडी यासह विविध ठिकाणच्या 73 नैसर्गिक विसर्जन स्थळी तसेच 162 कृत्रिम तलावांच्या ठिकाणी पालिकेने विसर्जनाची तयारी केली आहे. तर वाहतूक पोलिसांनी गिरगाव, दादर, जुहू, मालाड मालवणी टी जंक्शन आणि गणेश घाट पवई यासारख्या महत्त्वाच्या विसर्जनाच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. विसर्जनादरम्यान वाहतुकीचे नियमन व नियंत्रण करण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी निरीक्षण मनोरे उभे करण्यात आले आहेत.

- Advertisement -

दरम्यान मुंबईत गणरायाच्या विसर्जन सोहळ्यात कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी शुक्रवारी सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 तारखेपर्यंत मुंबईत वाहतूक व्यवस्थापनासाठी पोलीस, वाहतूक विभाग आणि होमगार्डचे मिळून तब्बल 10,600 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

मुंबईत गणपती विसर्जनासाठी बंद असलेले रस्ते

  1. सँडहर्स्ट रोडचा मार्ग हा मरीन ड्राईव्ह ते ओपेरा हाऊस, प्रार्थना समाज याठिकाणापर्यंत बंद असेल. यामुळे वाडीबंदर उड्डाणपूल बंद राहील.

2. प्रिन्सेस स्ट्रीट ते ठाकूरद्वार जंक्शन

- Advertisement -

3. माधव बाग ते सीपी टँक सर्कल

4. नानुभाई देसाई रोड

5. एन.ए. पुरंदरे मार्ग ते हयुजेस रोड

6. नागपाडा जंक्शन ते मुंबई सेंट्रल जंक्शन

7. खडा पारशी जंक्शन ते नागपाडा जंक्शन

8. चिंचपोकळी जंक्शन ते खटाव मिल

9. भारतमाता जंक्शन ते बावला कंपाऊंड

10. एलबीएस रोड ते North Modela light signal junction पासून मुलुंड टोलनाक्यापर्यंत बंद

11. साकीविहार रोड मार्गावरील वाहतूक बीए रोड ते जेव्हीएलआर रोडपर्यंत बंद

12. आरे जंक्शन ते फिल्टरपाडा वाहतूक बंद

13. आरे जंक्शन ते मरोळ नाका वाहतूक बंद

14. महापालिका मार्ग सीएसएमटी ते मेट्रो सिनेमापर्यंत वाहतूक बंद

यामुळे उत्तरेकडे जाणारी वाहतूक डीएन रोडने वळवली जाईल. मेट्रो सिनेमा जंक्शन ते सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक महापालिका मार्गावर वन-वे चालवली जाईल.

15. बेस्ट बस वगळता हा वाळकेश्वर रस्ता तीन बत्ती ते बँडस्टँडपर्यंत वाहतुक बंद

16. दादर टीटी जंक्शन ते कोतवाल गार्डनपर्यंत टिळक रोड बंद

17. वीर सावरकर मार्ग उत्तर दिशेची दोन्ही मार्गावरील वाहतूक दक्षिणेकडून वळवण्यात येईल.

18. सांताक्रूझ पोलीस स्टेशन ते खार सबवे जंक्शनपर्यंतचा दक्षिणेकडे जाणारा लिंकिंग रोड बंद

या मार्गांवर मालवाहू वाहनांना प्रवेश नाही

  1. एसके बोले रोड

2. भवानी शंकर रोड

3. एनसी केळकर रोड

4. वीर सावरकर मार्ग

5. गोखले रोड

6. टिळक ब्रिज एलबीएस मार्ग कुर्ला ते नारायण नगर ते श्रेयस जंक्शन, गांधी नगर

या मार्गांवर पार्किंगवर बंदी

  1. प्रिन्सेस स्ट्रीट जंक्शन ते ठाकुरद्वार जंक्शन

2. सीपी टँक सर्कल ते भालचंद्र कंपनी

3. कोहिनूर जंक्शन ते दादर हायवे अपार्टमेंटस

4. एमटीएनएल जंक्शन ते फॅमिली कोर्ट

5. अंधेरी मेयर हॉल ते जुनैद नगर

6. जे.पी रोड बस डेपो ते आराम नगर गार्डन, वर्सोवा

7. लोखंडवाला रोड

8. जॉगर्स रोड हॉटेल लव्हपासून आणि स्काय गार्डन बिल्डिंगपर्यंत बंद

दरम्यान पुण्यातही विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांची होणारी मोठ्या प्रमाणातील गर्दी पाहता बहुतांश रस्ते शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून ते मिरवणूक संपेपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

पुण्यात सकाळी 7 वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद असलेले रस्ते 

  1. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता ते काकासाहेब गाडगीळ जंक्‍शन ते जेधे चौक.

2. लक्ष्मी रस्ता ते संत कबीर चौकी ते टिळक चौक

3. बाजीराव रस्ता ते बजाज पुतळा चौक ते फुटका बुरूज चौक

4. कुमठेकर रस्ता ते टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक

5. टिळक रस्ता ते जेधे चौक ते टिळक चौक

6. गणेश रस्ता ते दारूवाला पूल ते जिजामाता चौक

7.केळकर रस्ता ते बुधवार चौक ते टिळक चौक

8.लाल बहादूर शास्त्री रस्ता ते  सेनादत्त चौकी चौक ते टिळक चौक

9. जंगली महाराज रस्ता ते झाशी राणी चौक ते खंडुजी बाबा चौक

10. गुरू नानक रस्ता ते देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक, गोविंद हलवाई चौक

पुण्यात दुपारनंतर बंद होणारे रस्ते

  1. प्रभात रस्ता ते डेक्कन पोलिस ठाणे ते शेलारमामा चौक

2. कर्वे रस्ता ते नळस्टॉप चौक ते खंडुजीबाबा चौक

3. फग्युर्सन महाविद्यालय रस्ता ते खंडुजीबाबा चौक ते फग्युर्सन महाविद्यालय प्रवेशद्वार

4. भांडारकर रस्ता ते पीवायसी जिमखाना ते गुडलक चौक, नटराज चौक

5. पुणे सातारा रस्ता ते व्होल्गा चौक ते जेधे चौक

6. सोलापूर रस्ता ते सेव्हन लव्हज्‌ चौक ते जेधे चौक

या रस्त्यांवर पार्किंगवर बंदी 

लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, फग्युर्सन रस्ता, खंडुजी बाबा चौक ते वैशाली हॉटेलदरम्यान जोडणाऱ्या उपरस्ता परिसरातील १०० मीटर परिसरात पार्किंगसाठी बंदी राहील.

वाहतूक वळवली जाणारी ठिकाणे

जंगली महाराज रस्ता : झाशी राणी चौक

शिवाजी रस्ता : स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा

मुदलियार रस्ता : अपोलो चित्रपटगृह

नेहरू रस्ता : संत कबीर पोलिस चौकी

सोलापूर रस्ता : सेव्हन लव्हज चौक

सातारा रस्ता : व्होल्गा चौक

बाजीराव रस्ता : पूरम चौक

लाल बहादूर शास्त्री रस्ता : सेनादत्त पोलिस चौक

कर्वे रस्ता : नळस्टॉप

फग्युर्सन महाविद्यालय रस्ता : गुडलक चौक


ट्रम्प महाशय ‘भान’ ठेवून…’ सामनातून थेट अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -