घरताज्या घडामोडीवाहतूककोंडीत अडकलेल्या डॉक्टरांनी 3 किमी धाव घेत वाचवला रुग्णाचा जीव

वाहतूककोंडीत अडकलेल्या डॉक्टरांनी 3 किमी धाव घेत वाचवला रुग्णाचा जीव

Subscribe

वाहतुककोंडीत अडकलेल्या एका डॉक्टरने रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी गाडी रस्त्यावर सोडून 3 किलोमीटर धाव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोविंद नंदकुमार असे या डॉक्टरांचे नाव आहे. डॉ. गोविंद नंदकुमार सर्जापूर येथील मणिपाल रुग्णालयात तातडीच्या लॅप्रोस्कोपिक पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यासाठी जात होते.

वाहतुककोंडीत अडकलेल्या एका डॉक्टरने रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी गाडी रस्त्यावर सोडून 3 किलोमीटर धाव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोविंद नंदकुमार असे या डॉक्टरांचे नाव आहे. डॉ. गोविंद नंदकुमार सर्जापूर येथील मणिपाल रुग्णालयात तातडीच्या लॅप्रोस्कोपिक पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यासाठी जात होते. त्यावेळी रस्त्यांत असलेल्या वाहतुककोंडीमुळे त्यांनी गाडी रस्त्यात सोडून रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली. विशेष म्हणजे डॉ. गोविंद नंदकुमार हे रुग्णालयात वेळेच पोहचले असून, त्यांनी रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. (doctor leaves car runs 3 km to beat traffic to perform crucial surgery in bangalore)

30 ऑगस्ट रोजी ही घटना घडल्याचे समजते. याबाबत डॉ. गोविंद नंदकुमार यांनी अधिक माहिती दिली आहे. “30 ऑगस्ट रोजी कनिंगहॅम रोडवरून सर्जापूरच्या मणिपाल हॉस्पिटलमध्ये जात असताना मुसळधार पाऊस आणि ठिकठिकाणी पाणी साठल्याने रुग्णालय केवळ 3 किलोमीटरच्या अंतरावर असताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला”, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

“शस्त्रक्रिया होईपर्यंत रूग्णाला काहीही खाण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे जर वाहतूक कोंडी सुटेपर्यंत थाबवे लागले असते तर, रूग्णाला बराच कळा उपाशी बसावे लागले असते. त्यामुळे कारमधून उतरून धावत जाण्याचा निर्णय घेतला”, असेही डॉं. नंदकुमार यांनी सांगितले.

दरम्यान, डॉ. गोविंद नंदकुमार हे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीचे सर्जन आहेत. नंदकुमार गेल्या 18 वर्षांपासून सर्जरी करत असून, त्यांनी आतापर्यंत 1,000 हून अधिक यशस्वी सर्जरीज केल्या आहेत. त्यांचा पचनक्रियेशी संबंधित सर्जरी करण्यात हातखंडा आहे.

- Advertisement -

हेही वाचा – महत्त्वाची बातमी! पुणेकरांचा पाणीपुरवठा बुधवार रात्रीपासून 24 तासांसाठी बंद

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -