घरक्रीडाआयसीसीच्या नियमांत मोठे बदल; आता खेळाडूंना राहावे लागणार सतर्क

आयसीसीच्या नियमांत मोठे बदल; आता खेळाडूंना राहावे लागणार सतर्क

Subscribe

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) क्रिकेट नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत. आयसीसीच्या या बदलांमुळे क्रिकेट अधिक वेगवान होणार आहे. तसेच, खेळाडू आणि सामन्याच्या दृष्टीने हे नियम योग्य मानले जात आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) क्रिकेट नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत. आयसीसीच्या या बदलांमुळे क्रिकेट अधिक वेगवान होणार आहे. तसेच, खेळाडू आणि सामन्याच्या दृष्टीने हे नियम योग्य मानले जात आहेत. क्रिकेटमधील हे नवे नियम मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (MCC) बनवले आहेत. येत्या ऑक्टोबरपासून हे नियम लागू होणार असल्याची माहिती मिळते. (ICC New rules for cricket saliva use completely banned)

आयसीसीच्या नव्या नियमांनुसार, कोरोनाच्या काळात क्रिकेट सामना खेळताना चेंडू चमकवण्यासाठी लाळेच्या वापरावर तात्पूर्ती बंदी घालण्यात आली होती. आयसीसीच्या नव्या नियमांमध्ये ही बंदी कायमस्वरुपी करण्यात आली आहे. तसेच, एखादा खेळाडू झेलबाद झाल्यास नवा खेळाडूच ‘striker’ म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. शिवाय, टी-20 क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू बाद झाल्यास दुसऱ्या फलंदाजाला 90 सेकंदात मैदानात यावे लागणार आहे.

- Advertisement -

90 सेकंदात क्रीझवर येणे बंधनकारक

टी-20 क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू बाद झाल्यास दुसऱ्या फलंदाजाला 90 सेंकदात क्रीझवर येणे बंधनकारक असणार आहे. जर फलंदाज या वेळेत क्रीझवर पोहोचू शकला नाही, तर विरोधी संघाचे खेळाडू आऊटचे अपील करु शकणार आहेत. पूर्वी ही वेळ 3 मिनिटे होती. त्यामुळे फलंदाजांना सतर्कता बाळगावी लागणार आहे. दरम्यान, फलंदाज बाद झाल्यानंतर नवा खेळाडू वनडे आणि टेस्टमध्ये 2 मिनिटांच्या आत क्रिझवर आला पाहिजे.

- Advertisement -

झेलबाद

फलंदाज झेलबाद होतो, त्यावेळी ‘striker’ आणि ‘Non-striker’ यांनी धाव घेतल्याने बाद झालेल्या खेळाडूच्या जागेवर ‘Non-striker’ फलंदाजी करणार असा नियम होता. मात्र, आता या नियमातही बदल करण्यात आला आहे. आयसीसीच्या नव्या नियमानुसार, खेळाडू झेलबाद झाल्यानंतर नव्या खेळाडूलाच फंलदाजी करता येणार आहे.

गोलंदाजाचे रनअपवेळी असभ्य वर्तन

गोलंदाजाने गोलंदाजी करत असताना काही अयोग्य वर्तन केले किंवा जाणूनबुजून चुकीची हालचाल केली, तर पंच त्यावर कारवाई करू शकतात. या नियमात अंपायर 5 धावांची पेनल्टीही लावू शकतात. तसेच, अंपायर तो चेंडू डेड बॉलही घोषित करु शकणार आहेत.

मांकडिंग रन आउट

गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वी नॉन-स्ट्रायकर एंडला असलेल्या फलंदाजाला क्रीझमधून बाहेर येता येणार नाही. गोलंदाजाच्या हे लक्षात आले आणि त्याने चेंडूने बेल्स उडवल्या तर त्याला मांकडिंग नियामाद्वारे रनआऊट करता येणार आहे.

इन-मॅच पेनल्टी नियम

हा नियम 2023 विश्वचषकापासून लागू करण्यात येणार आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाला निर्धारित वेळेतच संपूर्ण ओव्हर्स टाकाव्या लागतील. जर ते त्या वेळेत संपूर्ण षटके संपवू शकले नाहीत तर त्या वेळेपासून इंनिंग संपेपर्यंत एक फिल्डर सीमारेषेवरुन हटवून सर्कलच्या आत ठेवावा लागेल.


हेही वाचा – टी-20 विश्वचषक : ‘पाकिस्तान’ची नवी जर्सी लीक; चाहत्यांनी उडवली खिल्ली

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -