घरमुंबईठाण्यात पालिकेच्या शाळेतील ८ फूट उंचीची संरक्षण भिंत कोसळली; सुदैवाने जीवितहानी नाही

ठाण्यात पालिकेच्या शाळेतील ८ फूट उंचीची संरक्षण भिंत कोसळली; सुदैवाने जीवितहानी नाही

Subscribe

ठाणे – परबवाडी येथील ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक-१८ या शाळेची सुमारे ३५ फुट लांब व ०८ फूट उंच संरक्षण भिंत पडल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास समोर आली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून उर्वरित भिंत धोकादायक भिंतही पाडण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

ठाणे, परबवाडी परिसरातील ज्ञानसाधना कॉलेजजवळ, शिवसेना शाखेच्या बाजूला असलेल्या ठामपा शाळेची संरक्षण भिंत पडल्याची माहिती कनिष्ठ अभियंता मनोज काळे यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली. त्यानंतर, घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, उप-अभियंता व कनिष्ठ अभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग) यांनी धाव घेतली. तसेच जेसीबी मशीनच्या सहाय्याने पडलेल्या भिंतीचे डेब्रिज बाजूला करण्याबरोबर धोकादायक झालेली भिंत पाडण्यात आली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -