घरदेश-विदेशवाढते अपघात टाळण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; आता कारच्या प्रत्येक सीटसाठी सीट बेल्ट...

वाढते अपघात टाळण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; आता कारच्या प्रत्येक सीटसाठी सीट बेल्ट अलार्म बंधनकारक

Subscribe

राज्यात गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे केंद्र सरकारकडूनही अपघात टाळण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. यात आता कारच्या मागील सीटवरील प्रवाशाने सीट बेल्ट न लावल्यास अलार्म वाजणार आहे. सध्या बहुतांश कारमध्ये मागील सीटवर सीट बेल्ट अलार्म सिस्टम नाही, फक्त काही लक्झरी कारमध्येचं मागील सीटवर बेल्ट अलार्म सिस्टम बसविली आहे. पण केंद्र सरकारने नवी नियमावली जारी करत कार कंपन्यांना सर्व कारमध्ये सीटवर सीट बेल्ट अलार्म सिस्टम बसवणे बंधनकारक केले आहे. यासह ओव्हर स्पीडिंगसाठी स्पीड अलर्ट सिस्टीम आणि सेंट्रल लॉकिंग सिस्टिमसाठी मॅन्युअल ओव्हरराइड सिस्टम कारमध्ये बसवावी लागणार आहे.

कार अपघात झाल्यास कारची यंत्रणा पूर्णपणे बिघडते आणि अनेक घटनांमध्ये प्रवासी बाहेर येण्याचा प्रयत्न करतात मात्र ते कारमध्येच अडकून पडतात. अशा परिस्थिती मॅन्युअल ओव्हरराईड सिस्टम असल्यास वाहनाचा एक दरवाजा उघडेल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या या नियमावलीत तुम्हीही तुमचं मत नोंदवू शकणार आहात. 5 ऑक्टोबर 2022 ही मत नोंदवण्याची शेवटची तारीख आहे. टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांच्या रस्ते अपघातातील मृत्यूनंतर केंद्राने सीटबेल्ट संदर्भातील सर्व बदलांबाबत गांभीर्याने विचार केला आहे.

- Advertisement -

जागतिक बँकेच्या 2021 च्या अहवालानुसार, जगभरात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या सर्वाधित लोकसंख्येत भारताची क्रमांक लागतो. भारतात रस्ते अपघातात दर चार मिनिटाला एक मृत्यू होतोय.भारतातील वाहनांची संध्या जगाच्या तुलनेत केवळ 1 टक्के आहे, मात्र रस्ते अपघातातील मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दहापट आहे.

भारतात सध्या कारमधील सर्व प्रवाशांनी सीट बेल्ट लावणे बंधनकारक आहे, तसे न केल्यास दंडाची देखील तरतुद आहे. मात्र तरीही मागील सीटवरील बहुतांश प्रवासी प्रवासादरम्यान सीटबेल्ट लावत नाहीत. यात प्रशासनाच्या नियमांची काटेकोरपणे पालन होत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे कारमध्ये सीट बेस्ट अलार्म अनिवार्य करण्यापेक्षा सरकारने सीट बेल्ट न घालणाऱ्यांविरोधातील नियम अधिक कडक करण्याची मागणी कार कंपन्यांनी केली आहे. दरम्यान वाहतूक पोलिसांकडूनही आता नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. तसेच मोटार वाहन कायद्यांतर्गत सीट बेल्ट न लावणाऱ्या चालकांविरोधात हजार रुपये दंडाची आकारणी करत आहेत.


कॅनडात भारतीयांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्ह्यात वाढ; परराष्ट्र मंत्रालयाकडून अॅडव्हायजरी जारी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -