घरमुंबईअंधेरी येथे हायराईज इमारतीवरून उडी घेऊन महिलेची आत्महत्या

अंधेरी येथे हायराईज इमारतीवरून उडी घेऊन महिलेची आत्महत्या

Subscribe

अंधेरी येथे हायराईज इमारतीच्या 23 व्या मजल्यावरून उडी घेऊन वनिता लुथारा या 45 वर्षांच्या महिलेने आत्महत्या केली आहे. या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, तिच्या डोक्यावर परिणाम झाला होता, तिला विचित्र भास होत होते, त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे. वनिताचा मृतदेह कूपर रुग्णालयात पाठविण्यात आला असून तिच्या विदेशातील बहिणीला ही माहिती कळविण्यात आली आहे. ही घटना शनिवारी दुपारी सव्वादोन वाजता अंधेरीतील विरा देसाई रोडवरील सोरॅन्टो अपार्टमेंटमध्ये घडली.

वनिता ही अंधेरीतील वर्सोवा, चार बंगला परिसरात राहत असून तिचा लोखंडवाला संकुल परिसरात एक शॉप आहे. तिला काही दिवसांपासून विचित्र भास होत होते, त्यामुळे ती प्रचंड मानसिक तणावात होती. शनिवारी दुपारी ती तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी सोरॅन्टो अपार्टमेंटमध्ये आली होती. तिची मैत्रिण याच इमारतीच्या नवव्या मजल्यावर राहते, मात्र ती इमारतीच्या 23 व्या मजल्यावर गेली आणि तेथून तिने उडी घेतली होती. चौथ्या मजल्यावरील पार्किंगच्या जागेवर ती पडली होती. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -