घरमनोरंजनअखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या माजी संचालकांना 11 लाखांचा दंड, कारण...

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या माजी संचालकांना 11 लाखांचा दंड, कारण…

Subscribe

कोल्हापूरमधील सभासदांनी धर्मादाय आयुक्त यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर पहिल्यांदा चॅरिटी कमिशनरांनी ही रक्कम भरण्याचे आदेश दिले.

उच्च न्यायालयाकडून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या माजी संचालकांना सहा आठवड्याच्या आत 10 लाख 78 हजार 593 रूपयांचा दंड भरण्याचा आदेश देण्यात आला आहे. पुण्यात पार पडलेल्या मानाचा मुजरा या कार्यक्रमासाठी माजी संचालकांनी 52 लाख रूपयांचा खर्च केला होता. मात्र यावर चित्रपट महामंडळांच्या सभासदांनी आक्षेप घेतला होता.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या इतिहासाच पहिल्यांदाच अशी कारवाई झाली असल्याच अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सांगितले. यासंदर्भात कोल्हापूरमधील सभासदांनी धर्मादाय आयुक्त यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर पहिल्यांदा चॅरिटी कमिशनरांनी ही रक्कम भरण्याचे आदेश दिले. मात्र यामध्ये टंकलिखाणाची चूक झाल्याने माजी संचालकांनी रक्कम भरली नाही. त्यानंतर पुन्हा एका कोल्हापूर चॅरिटी कमिशनर यांनी टंकलिखाणाची चूक सुधारून नवा आदेश तयार करत रक्कम भरण्याचे आदेश दिले. मात्र यावेळी संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

- Advertisement -

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच संचालकांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. या संचालकांमध्ये प्रसाद सुर्वे, विजय पाटकर, विजय कोंडके, मिलिंद अष्टेकर, सतीश बिडकर, सुभाष भुरके, अनिल निकम, संजीव नाईक, सतीश रणदिवे, प्रिया बेर्डे, अलका कुबल, इम्तियाज बारगिर, सदानंद सूर्यवंशी, बाळकृष्ण बारामती आणि रवींद्र बोरगावकर या संचालकांचा समावेश आहे.

 

- Advertisement -

हेही वाचा : 

स्टॅनफोर्ड विद्यापीठात रंगली ‘एकदा काय झालं’ वर चर्चा

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -