घरमुंबईमुंबईचे डबेवाले कार्तिकवारीला

मुंबईचे डबेवाले कार्तिकवारीला

Subscribe

उद्या डबेवाहतूक सेवा राहणार बंद

कार्तिकी एकादशीनिमित्त मुंबई डबेवाला कार्तिकवारीसाठी आळंदीला निघाला आहे. त्यामुळे द्वादशीला (बारस) म्हणजेच मंगळवार, 4 डिसेंबरला मुंबई डबेवाल्यांची सेवा एक दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबईतील चाकरमान्यांना आपल्या घरच्या जेवणास मुकावे लागणार आहे.

कार्तिकी एकादशीनिमित्त मुंबई डबेवाले आपले सोमवारचे काम संपवून सायंकाळी ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी तीर्थक्षेत्र आळंदी येथे जाणार आहेत. मुंबईतील डबेवाले हे पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील असून बरेचजण माऊलींचे भक्त आहेत. एकादशीनिमित्त आळंदीला गेल्यानंतर मंगळवारी बारस सोडूनच ते मुंबईला परतणार असल्याने मंगळवारी मुंबईच्या चाकरमान्यांना घरचे जेवण मिळणार नाही. एकतर त्यांना आपला डबा सोबत आणावे लागेल किंवा खानावळ किंवा कॅन्टिनचा सहारा घ्यावा लागणार आहे. मात्र, बुधवारी नियमितपणे डबेवाले आपली सेवा देण्यासाठी तत्पर असतील, अशी माहिती मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके आणि रामदास करवंदे यांनी दिली.

- Advertisement -

3 तारखेला सोमवारी डबेवाले डबा पोहोचवण्याचे काम आटोपून आळंदी दर्शनाला निघतील. एकादशीनिमित्ताने डबेवाल्यांचा असणारा उपवासही आळंदीलाच मंगळवारी बारसदिनी सोडला जाईल. डबेवाल्यांची धार्मिक भावना समजून घेत मुंबईकर एका दिवसासाठी डबेवाल्यांना सहकार्य करतील, अशी अपेक्षा मुंबई जेवण डबेवाला संघटनेचे विलास शिंदे यांनी व्यक्त केली. मात्र, बुधवारी 5 तारखेला डबेवाला आपल्या रोजच्या कामाला रुजू होतील, असेही शिंदे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -