घरक्रीडाआमचे गोलंदाज कोहलीला अडचणीत टाकतील - टीम पेन

आमचे गोलंदाज कोहलीला अडचणीत टाकतील – टीम पेन

Subscribe

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने आमचे गोलंदाज कोहलीला अडचणीत टाकतील असे वक्तव्य केले आहे. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका ६ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेल्या कसोटी मालिकेच्या ४ सामन्यांत ४ शतके केली होती. तसेच तो सध्या चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे या मालिकेतही तो दमदार कामगिरी करेल अशी सर्वांना अपेक्षा आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने आमचे गोलंदाज कोहलीला अडचणीत टाकतील असे वक्तव्य केले आहे.

आमची वेगवान गोलंदाजी ही सर्वोत्तम  

टीम पेन कोहलीविषयी म्हणाला, “आमची वेगवान गोलंदाजी ही सर्वोत्तम आहे. आमच्या गोलंदाजांनी जर त्यांच्या क्षमतेनुसार गोलंदाजी केली तर ते कोहलीला अडचणीत टाकतील. पण त्यांनी रणनीतीनुसारच गोलंदाजी केली पाहिजे. कधीकधी ते जास्त आक्रमक होऊन गोलंदाजी करतात, पण तसे करून चालणार नाही. त्यामुळे त्यांची गोलंदाजी बिघडू शकते. जर फलंदाजांना अडचणीत टाकायचे असेल तर त्यांनी ठरलेल्या रणनीतीनुसारच गोलंदाजी करणे आवश्यक आहे.”

कोहलीला प्रतिस्पर्धी खेळाडूंशी पंगा घ्यायला आवडतो

द.आफ्रिकेविरुद्ध मार्चमध्ये झालेल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणाचा ऑस्ट्रेलियन संघाला मोठा फटका बसला. त्यामुळे या प्रकरणातून धडा घेऊन त्यांनी आपला आक्रमकपणा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, असे असले तरी कोहलीसारख्या फलंदाजाचे लक्ष विचलीत करण्यासाठी आम्ही प्रत्येक मार्ग अवलंबू असे टीम पेन म्हणाला. “कोहली हा असा खेळाडू ज्याला प्रतिस्पर्धी खेळाडूंशी पंगा घ्यायला आवडतो. पण तरी आम्ही त्याला मध्यमध्ये भडकवण्याचा प्रयत्न करू. पण तेही एका मर्यादेपर्यंत. इतर वेळी आम्ही फक्त चांगली गोलंदाजी करून त्याला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तो लवकर बाद होईल.”
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -