घरमहाराष्ट्रमराठा विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी आरक्षणाचा फायदा

मराठा विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी आरक्षणाचा फायदा

Subscribe

मराठा समाजाला महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या १६ टक्के आरक्षणाचा मोठा फायदा यावर्षी वैद्यकीय प्रवेशासाठ होऊ शकतो. शासन निर्णय जारी झाल्यानंतर लगेच त्याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचानालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिणगारे यांनी सांगितले आहे.

वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थ्यांमध्ये दरवर्षी काटे की टक्कर असते. राज्यात दरवर्षी २ लाखाहून अधिक विद्यार्थी वैद्यकीय प्रेवेशासाठी अर्ज करतात. यावर्षी शासकीय महाविद्यालयांत एमबीबीएसच्या एकूण ३११० जागा आणि बीडीएसच्या २६० जागा उपलब्ध आहेत. तर खाजगी महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या १७२० आणि बीडीएसच्या २३५० जागा उपलब्ध आहेत. या जागांमध्ये मराठा विद्यार्थ्यांना आता आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. मराठा समाजाला महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या १६ टक्के आरक्षणाचा मोठा फायदा यावर्षी वैद्यकीय प्रवेशासाठ होऊ शकतो. शासन निर्णय जारी झाल्यानंतर लगेच त्याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचानालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिणगारे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा – मराठा समाजाला सरकारी भरतीमध्ये १६ टक्के आरक्षण – मुख्यमंत्री

- Advertisement -

राज्यात आरक्षण, पण देशपातळीवर खुल्या प्रवर्गात

वैद्यकीय शिक्षणासाठी राज्यातील उमेदवारांकरीता राज्य कोट्यांतर्गत ८५ टक्के राखीव जागा असतात. मराठा आरक्षण लागू झालानंतर त्यांना देखील या राखीव कोट्याचा लाभ होणार आहे. परंतु, मराठा उमेदवारांना हा लाभ फक्त राज्य पातळीवर होणार आहे. देशपातळीवर उर्वरीत १५ टक्के कोट्यामध्येच मराठा तरुणांना स्पर्धा करावी लागणार आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासंबंधी बोलताना डॉ.प्रवीण शिणगारे यांनी सांगितले की, १६ टक्के आरक्षणाचा शासन निर्णय निघताच त्याची अंमलबजावणी होणार आहे. उर्वरीत १५ टक्के देशपातळीवरील कोट्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी राखीव असणाऱ्या जागांमध्ये अमेदवारांना आरक्षण मिळणार नाही तर तिथे त्यांना स्पर्धा करावी लागेल असेही डॉ. शिणगदारे यांनी सांगितले.


हेही वाचा – मराठा आरक्षणानुसार आता; २४ हजार शिक्षकांची भरती होणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -