घरदेश-विदेशहिमाचलच्या कुल्लूमध्ये भीषण अपघात; बस दरीत कोसळल्याने 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 10...

हिमाचलच्या कुल्लूमध्ये भीषण अपघात; बस दरीत कोसळल्याने 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 10 जखमी

Subscribe

हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यातील जालोरी जोतला भेट देण्यासाठी गेलेल्या पर्यटकांच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. यात 17 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. बंजार येथील घियागी येथे रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पर्यटकांची टेम्पो ट्रॅव्हलर बस सुमारे 500 फूट खोल दरीत कोसळून हा अपघात झाला आहे.

राष्ट्रीय महामार्ग 305 वर घियागीयेथे यापूर्वीही अपघात झाले आहेत. अरुंद रस्ता आणि पावसामुळे संबंधित रस्ता निसरडा होत असल्याने हे अपघात घडत आहेत. आयआयटी वाराणसीच्या विद्यार्थ्यांसह एकूण 17 पर्यटक टेम्पो ट्रॅव्हलरने दिल्लीतील मजनून टिल्ला येथून कुल्लूला आले होते. यात चार विविध राज्यांतील पर्यटकांचा समावेश होता.
दरम्यान रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हे पर्यटक जालोरी जोत फिरून पुन्हा बंजारच्या दिशेने जात होते. यावेळी घियागी वळणावर उतरताना ब्रेक न लागल्याने कार थेट 500 फूट दरीत कोसळली. या अपघातात बसचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. यात चार पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला असून बाकीचे गंभीर जखमी झाले आहेत.

- Advertisement -

अपघातानंतर जखमींचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळ गाठून त्यांना दरीतून बाहेर काढले आणि त्यांना उपचारांपासून रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. घटनेची माहिती मिळताच आमदार सुरेंद्र शौरीही रुग्णालयात पोहोचले. जखमींना उपचारासाठी मुख्यमंत्र्यांनी मनाली-चंदीगड महामार्ग खुला ठेवण्याचे निर्देश दिले. गाडीचे ब्रेक लेदर गरम झाल्यामुळे काम करत नसल्याचे जखमींनी सांगितले. यावेळी ड्रायव्हरनेही गाडी थांबवली, पण अंधार आणि खराब हवामानामुळे पर्यटकांना सावकाश पुढे जात असताना ब्रेक न लागल्याने कार काही अंतरावर थेट दरीत कोसळली आणि हा अपघात घडला.


प्रवाशांसाठी खूशखबर! नवरात्रीत रेल्वेने जेवणासाठी सुरू केली खास सुविधा, जाणून घ्या…

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -