घरमुंबईमुख्यमंत्र्यांनी आरतीबाज लोकांपासून सावध राहावे - उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांनी आरतीबाज लोकांपासून सावध राहावे – उद्धव ठाकरे

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकास्त्र सोडले आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजन यांच्यापासून सावध राहावे, असा सल्ला ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना 'सामना' मुखपत्रातून दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजनसारख्या आरतीबाज लोकांपासून सावध राहावे, अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जलसंपदा मंत्री गिरिश महाजन यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी ‘सामना’ या मुखपत्रातून गिरिश महाजन यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना महाजन यांच्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. गिरीश महाजन यांनी आपल्या एका भाषणात म्हटले होते की, अडचणींमधून मार्ग काढण्याची मुख्यमंत्र्यांना ‘दैवी’शक्ती प्राप्त झाली आहे. याच मुद्यावर उद्धव ठाकरे यांनी महाजन यांच्यावर टीका केली आहे. गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाने अंगारे–धुपारे उडवले आहेत, असे ठाकरे म्हणाले आहेत.

हेही वाचा – उद्धव ठाकरे आझाद मैदानात, आश्वासनानंतर आंदोलन मागे

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री फडणवीस यांचे खास भगतगण मंत्रिमहोदय गिरीश महाजन यांनी अशी पंचारती ओवाळली आहे की जगातील सर्व जंतरमंतर, जादूटोणावाले भूमिगत झाले आहेत. अडचणींमधून मार्ग काढण्याची मुख्यमंत्र्यांना ‘दैवी’ शक्ती प्राप्त झाल्याचे महाजन यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात शेतकरी, कष्टकरी रस्त्यावर आहे व दैवी चमत्कार संचारलेले मुख्यमंत्री असतानाही बेळगावसह सीमा भागात मराठी माणूस चिरडला जात आहे. दैवी चमत्कारच आता सीमा प्रश्न सोडवू शकेल व ती ‘पॉवर’ आज फक्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आहे! गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाने अंगारे–धुपारे उडवले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनवाले नरेंद्र दाभोलकर यांचा आत्माही आता सांगत असेल, माझे खुनी पकडू नका! मुख्यमंत्र्यांनी अशा आरतीबाज लोकांपासून सावध राहिले पाहिजे, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

हेही वाचा – निवडणुकीत केलेला दावा खोटा होता का? – उद्धव ठाकरे

- Advertisement -

महाजन यांचे भाष्य हास्यास्पद – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी गिरीश महाजन यांचे बोलणे हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर फडणवीस हे देव असतील तर समस्त विरोधी पक्ष हा देवादिकांचे वाहन आहे. जसे नंदी हे शंकराचे, उंदीर हे श्री गजाननाचे वाहन आहे. दैवी शक्तीचा संचार हा फक्त सत्तेवर असतानाच का होतो? एकनाथ खडसे हे विरोधी पक्षनेते व त्यानंतर महाराष्ट्राचे प्रमुख मंत्री असताना तेदेखील अंगात संचारल्यासारखेच वागत-बोलत असत, पण फडणवीस यांनी खडसे यांची ‘पॉवर’ काढून घेताच त्यांच्यातील दैवी संचारही संपला व ते आता मुक्ताईनगरात वाती वळत बसले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ‘पॉवरबाज’ आशीर्वादाचा हात गिरीश महाजन यांच्या खांद्यावर ठेवल्याने त्यांनाही आज संचारल्यासारखे वाटत असावे, पण 2019 च्या आधी महाराष्ट्राची ‘पॉवर कट’ होऊ शकते आणि या भारनियमनाची सुरुवात आता झाली आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.


हेही वाचा – सामना: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरेंची खिल्ली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -