घरमहाराष्ट्रमुंबईचे डबेवाले कोणाच्या दसरा मेळाव्याला जाणार? शिवाजी पार्कात की बीकेसीत?

मुंबईचे डबेवाले कोणाच्या दसरा मेळाव्याला जाणार? शिवाजी पार्कात की बीकेसीत?

Subscribe

मुंबई – एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडल्यानंतर यंदाचा दसरा मेळावा प्रतिष्ठेचा बनणार आहे. ठाकरे आणि शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकारी कामाला लागले आहेत. मुंबईसह संपूर्ण राज्यात बॅनरबाजी सुरू आहे. याचदरम्यान, मुंबईचा डबेवाला नक्की कोणाच्या दसरा मेळाव्याला जाणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कात तर, बीकेसीत एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

संपूर्ण मुंबईची भूक भागवणारे मुंबईच्या डबेवालांना राजकारणातही तितकंच स्थान आहे. बाळासाहेब ठाकरे नेहमीच मुंबईच्या डबेवालांच्या पाठिशी राहिली आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला मुंबईचे डबेवाले आवर्जून उपस्थित राहत असत. बाळासाहेबांच्या मृत्यूनंतरही उद्धव ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी मुंबईचे डबेवाले शिवाजी पार्कवर गर्दी करत असत. मात्र, यंदा शिवसेनेतच फूट पडल्यानंतर मुंबईचे डबेवाले नक्की कोणाच्या बाजूला जातील हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

- Advertisement -

मुंबई डबेवाला अधिकृत संघटनेने आपण कोणाच्याच दसरा मेळाव्याला जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय. तर, मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकरांनी ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला जाणरा असल्याचं स्पष्ट सांगितलं आहे. मुंबई डबेवाल्यांमध्येच अशी फूट पडल्याने मुंबई डबेवाले कोणत्या गटाला तृप्त करणार हे दसरा दिवशीच पाहावं लागेल.

मुंबईच्या डबेवालांनी कोणा एका नेत्याची बाजू घेतल्यास त्यांना नुकसान होऊ शकतं. त्यामुळे मुंबईच्या डबेवाल्यांनी आपल्या घरात बसूनच दसरा मेळावा पाहावा असं सांगण्यात आल्याचं सूत्रांकडून समोर आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -