घरमनोरंजनबिग बी यांनी 'आपडी थापडी' चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत दिल्या शुभेच्छा

बिग बी यांनी ‘आपडी थापडी’ चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत दिल्या शुभेच्छा

Subscribe

अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्यासह नंदू माधव, संदीप पाठक, नवीन प्रभाकर, खुशी हजारे अशी जबरदस्त स्टारकास्ट या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

मराठी मनोरंजन क्षेत्रातून बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केलेला आघाडीचा अभिनेता श्रेयस तळपदे आता अभिनेत्री मुक्ता बर्वे सोबत ‘आपडी थापडी’ या चित्रपटातून आपल्या भेटीस येणार आहेत. 5 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं

दरम्यान बॉलिवूड मधील महानायक अमिताभ बच्चन अर्थात बिग बी यांनीसुद्धा आपडी थापडी या चित्रपटाचा ट्रेलर त्यांच्या ट्विटर अकाऊंट वरून शेअर करत चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. चित्रपटाचे संगीतकार रोहन विनायक यांचा उल्लेख करत अमिताभ बच्चन यांनी थेट मराठीतून चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. आहेत.

- Advertisement -

के सायलेंटच्या केसी पांडे यांची निर्मिती आणि प्रस्तुती असलेल्या ‘आपडी थापडी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद करीर यांनी केले आहे. सनीला करीर आणि आनंद करीर यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. तर अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्यासह नंदू माधव, संदीप पाठक, नवीन प्रभाकर, खुशी हजारे अशी जबरदस्त स्टारकास्ट या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचं संगीत आनंद भास्कर, हनीफ शेख आणि रोहन विनायक यांनी केलं आहे. प्रेक्षकांनाही या चित्रपटाविषयी खूप उत्सुकता आहे. अशातच थेट अमिताभ बच्चन यांच्याकडून चित्रपटाला शुभेच्छा मिळाल्यामुळे चित्रपटाविषयीची चर्चा नक्कीच वाढली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -