घरमुंबईशिवसेना भवन येथे जलवाहिनी फुटली, पाणीपुरवठा बंद न करता दुरुस्तीचे काम

शिवसेना भवन येथे जलवाहिनी फुटली, पाणीपुरवठा बंद न करता दुरुस्तीचे काम

Subscribe

मुंबई – भांडुप व अन्य काही ठिकाणी जलवाहिनी फुटण्याच्या घटना ताज्या असतानाच दादर शिवसेना भवन येथेही जलवाहिनी फुटल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पालिका जलअभियंता खात्याच्या अभियंत्यांनी व कर्मचाऱ्यांनी सदर विभागाचा पाणीपुरवठा बंद न करता या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले.

सदर जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू असताना नागरिकांना कोणत्याही प्रकारची पाण्याची समस्या उद्भवणाऱ नाही, असा विश्वास जलअभियंता खात्याचे प्रमुख जल अभियंता पुरुषोत्तम मालवदे यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

दक्षिण मुंबई भागात तानसा जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. शिवसेना भवन येथे तानसाची ५७ उंची व्यासाच्या जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम जल अभियंता खात्याने गुरुवारी दुपारी २ वाजतच्या सुमारास हाती घेतले. ही जलवाहिनी भूमिगत आहे. मात्र जलवाहिनी दुरुस्तीचे काम अवघड असतानाही पालिका जल अभियंता खात्याने ४० अभियंते, अधिकारी व कर्मचारी यांच्या साहाय्याने या फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. मात्र काम सुरू होण्यापूर्वीच या फुटलेल्या जलवाहिनीमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले.
सदर जलवाहिनी दुरुस्तीचे काम रात्री उशिरापर्यन्त पूर्ण होऊन पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे जलअभियंता खात्याने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -