घरमहाराष्ट्रपुणेमुंबई - पुणे महामार्गावर बसवर दगडफेक; प्रवासी जखमी तर बसचेही मोठे नुकसान

मुंबई – पुणे महामार्गावर बसवर दगडफेक; प्रवासी जखमी तर बसचेही मोठे नुकसान

Subscribe

मुंबई - पुणे एक्स्प्रेसवे वरील फूड मॉलमध्ये प्रवासी आणि व्यवस्थापक या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. यावरुनच ही दगडफेक करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर एका लक्झरी बसवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या घटनेत बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बसमधील प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दगडफेकीत काही प्रवाशांना दुखापत झाली. जखमी प्रवाशांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल कारण्यात आले आहे. ( An incident of stone pelting has taken place on a luxury bus on the Mumbai-Pune Expressway heading towards Mumbai)

मुंबई – पुणे एक्स्प्रेसवे वरील फूड मॉलमध्ये प्रवासी आणि व्यवस्थापक या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. यावरुनच ही दगडफेक करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली. यानंतर लगेचच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दाखल घेतली. या प्रकरणासंबंधी अधिक तपास सुरु आहे.

- Advertisement -

खालापूर टोलनाक्याजवळ अज्ञातांनी या खासगी बसवर दगडफेक केली. अचानक झालेल्या या दगडफेकीमुळे बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या दगडफेकीत लक्झरी बसच्या काचा फुटल्या. तसेच प्रवाशी सुद्धा जखमी झाले. परीसरात खळबळजनक वातावरण निर्माण झाले. या घडलेल्या प्रकारात सुदैवाने जीवितहाने झाली नाही.


हे ही वाचा – महामार्गासोबतच ट्रॅव्हल्स बसची तपासणी आवश्यक

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -