घरक्रीडाVirat Kohli 34th Birthday : आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर कोहलीच्या नावे सर्वाधिक विक्रमांची नोंद

Virat Kohli 34th Birthday : आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर कोहलीच्या नावे सर्वाधिक विक्रमांची नोंद

Subscribe

रन-मशीन आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलाचा आज (5 नोव्हेंबर) 34वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त विराटला सोशल मीडियावरून अनेक चाहते शुभेच्छा देत आहेत. विराटच्या वाढत्या वयानुसार त्याची क्रिकेट कारकिर्दही वाढती आहे.

रन-मशीन आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलाचा आज (5 नोव्हेंबर) 34वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त विराटला सोशल मीडियावरून अनेक चाहते शुभेच्छा देत आहेत. विराटच्या वाढत्या वयानुसार त्याची क्रिकेट कारकिर्दही वाढती आहे. विराट कोहलीने आपल्या खेळीच्या जोरावर जागतिक क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा कायम ठेवला आहे. कर्णधार म्हणून असो किंवा फलंदाज म्हणून, त्याचे लक्ष्य नेहमीच भारतीय संघाचा विजय हेच राहिले आहे आणि बहुतेक प्रसंगी त्याला त्यामध्ये यश मिळाले आहे. (virat kohli 34th birthday kohli has most runs after his international debut and his records)

विराट कोहलीने 14 वर्षांपूर्वी म्हणजेच 18 ऑगस्ट 2008 रोजी भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणानंतर विराटने तुफानी खेळी केली. जागतिक क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. शिवाय, त्याच्यापेक्षा जास्त शतके, द्विशतके, अर्धशतके झळकावणारा, जास्त सामनावीर आणि मालिकावीर अशी खिताब जिंकणारा दुसरा कोणताही खेळाडू नाही.

- Advertisement -

विराट कोहलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विक्रम

  • सर्वाधिक धावा – कोहली (24350)
  • सर्वाधिक शतके – कोहली (७१)
  • सर्वाधिक 50 – कोहली (१२८)
  • सर्वाधिक 200 – कोहली (7)
  • सर्वोच्च सरासरी – कोहली (53.99)
  • सर्वात जास्त सामना – कोहली (60)
  • सर्वाधिक सामनावीर – कोहली (19)

विराट कोहलीने 2008 मध्ये आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला अंडर-19 विश्वचषक जिंकून दिले. त्यानंतर काही दिवसातच विराटला भारतीय एकदिवसीय संघात प्रवेश मिळाला. 2008 मध्ये विराट भारतासाठी पहिला एकदिवसीय सामना खेळला. परंतु दोन वर्षानंतर त्याला T20 संघात स्थान मिळाले आणि त्याने 12 जून 2010 रोजी हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध पहिला सामना खेळला. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पदार्पण केल्यानंतर तीन वर्षांनी किंग्स्टनमध्ये 20 जून 2011 रोजी त्याला वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळायला मिळाला. तेव्हापासून तो क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा भाग आहे.

- Advertisement -

विराट कोहलीची क्रिकेट कारकीर्द

  • 102 कसोटी सामन्यांमध्ये 49.53 च्या सरासरीने 27 शतकांसह 8074 धावा केल्या आहेत आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या 254 नाबाद आहे.
  • 262 एकदिवसीय सामन्यांमध्ये 57.68 च्या सरासरीने 12,344 धावा केल्या आहेत आणि 43 शतके ठोकली आहेत तर सर्वोत्तम धावसंख्या 183 धावा आहे.
  • 113 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत ज्यामध्ये 53.13 च्या सरासरीने 3932 धावा केल्या आहेत आणि शतक देखील केले आहे तर सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 122 आहे.

हेही वाचा – मेलबर्नमधील विराट कोहलीच्या वाढदिवसाबाबत अश्विनने सांगितले गुपित; म्हणाला…

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -