घरदेश-विदेशमाझ्या उजव्या पायाला तीन गोळ्या लागल्या, इम्रान खान यांचा दावा

माझ्या उजव्या पायाला तीन गोळ्या लागल्या, इम्रान खान यांचा दावा

Subscribe

इस्लामाबाद : माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाच्या लाँग मार्चदरम्यान झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आपल्या उजव्या पायातून तीन गोळ्या काढण्यात आल्याचा दावा इम्रान खानने केला आहे. याशिवाय त्याच्या डाव्या पायाला गोळ्यांचे छर्रे लागले आहेत. या हल्ल्यासाठी त्यांनी पाकिस्तानचे शाहबाज शरीफ सरकारला जबाबदार धरले आहे. आपल्या विरोधात तयार करण्यात आलेल्या योजनेनुसार हा हल्ला झाल्याचा दावा इम्रान खान यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केला आहे.

मी साडेतीन वर्षे सत्तेत होतो, त्यामुळे माझे गुप्तचर यंत्रणेत काही सूत्रं आहेत. याच सूत्रांकडून या हल्ल्यासंदर्भातील सूचना मला मिळाल्या होत्या, असे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. आपल्यावरील हल्ल्याचा कट दोन महिनेआधीच रचला होता. आपल्याला सत्तेतून खाली खेचण्यात आले, तेव्हापासूनच हे कारस्थान रचण्यास सुरुवात झाली होती, असा दावाही त्यांनी केला. यामागचे कारण देताना इम्रान खान म्हणाले, माझ्या पक्षाची अवस्था बिकट होईल, असा विरोधकांचा विश्वास होता. पण नंतर आपल्याला आणि माझ्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफला लोकांचा पूर्ण पाठिंबा मिळाला.ॉ

- Advertisement -

इम्रान खान यांचे राष्ट्रपतींना पत्र
इम्रान खान यांनी पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी यांना एक पत्र पाठविले आहे. त्यात, सत्तेचा दुरुपयोग तसेच कायदे आणि संविधानाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आवाहन इम्रान खान यांनी केली आहे.
कोणतीही व्यक्ती किंवा विविध यंत्रणा देशातील कायद्याच्या वर असू शकत नाही. या यंत्रणांतील समाजकंटकांकडून नागरिकांशी मोठ्या प्रमाणावर गैरवर्तन केले जात असल्याचे पाहत आहोत. कोठडीत छळ आणि अपहरण या सर्व गोष्टी केल्या जात आहेत, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. तुमच्याकडे देशातील सर्वोच्च पद आहे. त्यामुळे सत्तेचा होणारा दुरुपयोग आणि कायद्याचे तसेच घटनेचे उल्लंघन रोखण्यासाठी आत्ताच पावले उचला. जेणेकरून प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण होईल, असे आवाहन इम्रान खान यांनी केले आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -