घरमहाराष्ट्रपुणेधक्कादायक : पुण्यातील 19 वर्षीय तरुणाची हत्या; पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरूच

धक्कादायक : पुण्यातील 19 वर्षीय तरुणाची हत्या; पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरूच

Subscribe

प्रणवचे महाविद्यालयात काही मुलांसोबत त्याचे वाद झाले. त्यानंतर रविवारी सायंकाळी मी वाढदिवसाच्या पार्टीला चाललो आहे असे सांगून प्रणव घराबाहेर पडला.

पुण्यामध्ये (pune) सध्या गुन्हेगारीचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातही पुण्यातील पिंपरी चिंचवड (pimpari chnchwad) भागात अधिक प्रमाणात गुन्हे घडत आहेत. अशातच मावळ तालुकयातील 19 वर्षीय मुलावर 15 तर 20 जणांच्या टोळीने हल्ला करत मुलाची हत्या केयी आहे. या घटनेमुळे तळेगाव आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे.

पुण्यातील मावळ मध्ये 19 वर्षीय मुलावर 15 ते 20 जणांच्या टोळीने हल्ला केला. मुलावर कोयत्याने वार करत मुलाची हत्या करण्यात आली आहे. प्रणव ज्ञानेश्वर मांडेकर (pranav dyaneshwar mandekar) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. या मुलाचे वय 19 वर्षे असून इंदोरी, तालुका मावळ जिल्हा पुणे येथे राहणारा होता. या प्रकरणी प्रणवच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादातून प्रणवचा खून करण्यात आला असल्याने या प्रकरणी तळेगाव पोलीस ठाणे येथे 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रणव मांडेकर हा इंद्राणी महाविद्यालयात (indradi college) प्रथम वर्षाला शिकत होता. दरम्यान प्रणवचे महाविद्यालयात काही मुलांसोबत त्याचे वाद झाले. त्यानंतर रविवारी सायंकाळी मी वाढदिवसाच्या पार्टीला चाललो आहे असे सांगून प्रणव घराबाहेर पडला. यावेळी तो मित्रांसोबत गप्पा मारत असताना अचानक 15 ते 20 जणांनी येऊन प्रणववर कोयत्याने वार केले. तो मित्रांसह पळून जात असताना 15 ते 20 जणांच्या टोळीने त्याचा पाठलाग करून त्याच्यावर हल्ला केला. सर्वांनी मिळून त्याच्यावर कोयत्याने गंभीर वार केले त्यात प्रणवचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. या सर्व प्रकरणानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


हे ही वाचा – ‘हर हर महादेव’वरून राष्ट्रवादी-मनसे आमनेसामने; राज ठाकरेंचा उल्लेख करत दिग्दर्शकही संतापले

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -