घरदेश-विदेशइस्रोने रचला इतिहास, पहिल्या खासगी रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण

इस्रोने रचला इतिहास, पहिल्या खासगी रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण

Subscribe

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले की, 100 स्टार्ट अप्सने अंतराळ तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रात काम करण्यासाठी ISRO सोबत करार केला आहे. गुरुवारी बेंगळुरू टेक समिट-2022 मध्ये R&D - इनोव्हेशन फॉर ग्लोबल इम्पॅक्ट या विषयावर ते बोलत होते.

नवी दिल्ली – इस्रोने (ISRO) आज नवा इतिहास रचला आहे. देशातील पहिल्या खासगी रॉकेटचं (First Private Rocket) आज प्रक्षेपण करण्यात आलं. स्कायरुट एरोस्पेस (Skyroot Aerospace) या कंपनीकडून हे रॉकेट तयार करण्यात आलं आहे. सकाळी. ११.३० मिनिटांनी या रॉकेटचं प्रक्षेपण झालं. या रॉकेटला १५ नोव्हेंबरला लॉन्च करण्यात येणार होतं. मात्र, वाईट हवामानामुळे आज या रॉकेटचं प्रक्षेपण करण्यात आलं. आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटा येथून या रॉकेटने उड्डाण घेतलं.

स्कायरूट एरोस्पेसने या कंपनीने त्यांच्या या पहिल्या प्रकल्पाला प्रारंभ असं नाव दिलंय. स्कायरूटसाठी हे मिशन एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो, कारण पुढील वर्षी प्रक्षेपणासाठी नियोजित असलेल्या विक्रम-1 ऑर्बिटल वाहनामध्ये वापरल्या जाणार्‍या 80 टक्के तंत्रज्ञानाची पडताळणी करण्यास मदत होईल. १०० किमी झेप घेतल्यानंतर हे रॉकेट समुद्रात कोसळणार आहे.

- Advertisement -


भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले की, 100 स्टार्ट अप्सने अंतराळ तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रात काम करण्यासाठी ISRO सोबत करार केला आहे. गुरुवारी बेंगळुरू टेक समिट-2022 मध्ये R&D – इनोव्हेशन फॉर ग्लोबल इम्पॅक्ट या विषयावर ते बोलत होते.

यावेळी त्यांनी सांगितले की 100 पैकी जवळपास 10 अशा कंपन्या आहेत, ज्या उपग्रह आणि रॉकेट विकसित करण्यात गुंतलेल्या आहेत. यावेळी त्यांनी चांद्रयान III बद्दल माहिती देताना सांगितले की ते लवकरच प्रक्षेपित केले जाईल. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की अनेक मोहिमा आहेत ज्यावर इस्रो आणि अमेरिकन अंतराळ संस्था नासा एकत्र काम करत आहेत.

- Advertisement -

अवकाश तंत्रज्ञानाच्या वापराबाबत चर्चा करताना ते म्हणाले, अंतराळ मोहिमांसाठी जे तंत्रज्ञान आणि नवनवीन शोध दैनंदिन जीवनातही अनेक प्रकारे वापरले जातात. अनेक स्टार्टअप्स विशेषतः या पैलूवर काम करत आहेत. यासोबतच ते म्हणाले की, भारत सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्प आणि स्मार्ट उत्पादन प्रक्रियेत इस्रो हा महत्त्वाचा भागीदार आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -