घरपालघरमीरा-भाईंदरमध्ये हिंदी भाषा भवनाला मराठी एकीकरण समितीचा विरोध

मीरा-भाईंदरमध्ये हिंदी भाषा भवनाला मराठी एकीकरण समितीचा विरोध

Subscribe

राज्यातील किंवा शहरासाठी योगदान असलेल्या व्यक्तीचे नाव देण्यात यावे यासाठी हिंदी भाषा भवनाविरोधात समितीने सह्यांची मोहीम सुरू केली आहे.

भाईंदर :- मीरा-भाईंदर महापालिकेकडून मीरारोड भागात हिंदी भाषा भवन बनवण्यात येणार आहे. हिंदी भाषा भवनाचे लवकरच भूमिपूजन करण्यात येणार आहे. या हिंदी भाषा भवनाला मराठी एकीकरण समितीने विरोध केला आहे. या हिंदी भाषा भवनामुळे राज्याच्या भाषिक धोरणाचा भंग केला जात आहे. तसेच प्रांतिक भाषावाद व तेढ निर्माण केला जात असल्याचा आरोप समितीने केला आहे. मीरा -भाईंदर महापालिका काशीमिरा भागातील एका सुविधा भूखंडांवर हिंदी भाषा भवन बनवणार आहे. या हिंदी भाषा भवनाला साहित्यिक हरिवंशराय बच्चन यांचे नाव देण्यात येणार आहे. राज्यात एकही मराठी भाषा भवन बनवण्यात आलेले नाही. असे भाषेवरून बनवता येत नाही त्यामुळे मराठी एकीकरण समितीने या भवनाला विरोध केला. शहरात निर्माण होणार्‍या भवनाला असे भाषेवरून नाव न देता सांस्कृतिक भवन असे नाव द्यावे व त्याला राज्यातील किंवा शहरासाठी योगदान असलेल्या व्यक्तीचे नाव देण्यात यावे यासाठी हिंदी भाषा भवनाविरोधात समितीने सह्यांची मोहीम सुरू केली आहे.

 

- Advertisement -

शहरात निर्माण होणार्‍या वास्तूला आमचा विरोध नाही. परंतु या इमारतीला कोणत्याही भाषेवरून नाव देण्यात येऊ नये, यामुळे भाषिक व प्रांतिक तेढ निर्माण केला जात आहे. भाषेवरून नाव न देता वास्तू उभारून या वास्तूला राज्यासाठी किंवा शहरासाठी योगदान दिलेल्या व्यक्तीचे नाव देण्यात यावे असे केले नाही तर याला आमचा विरोध आहे. या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत.

-गोवर्धन देशमुख अध्यक्ष, मराठी एकीकरण समिती

- Advertisement -

 

शहरामध्ये निर्माण होणार्‍या भवनाला साहित्यिक , कविवर्य हरिवंशराय बच्चन हिंदी भाषा भवन नाव देण्यात येत असले तरी ते सर्वांसाठी असणार आहे. अनेक ज्येष्ठ साहित्यिक या भवनानिमित्त एकत्र येणार आहेत. ते एका भाषेसाठी किंवा समाजासाठी नसणार आहे. त्यामुळे अशा निर्माण होणार्‍या भवनाला विरोध करणे चुकीचे आहे.

–  प्रताप सरनाईक, आमदार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -