घरदेश-विदेशDecember Holiday List: अवघे 6 दिवस बाकी, बँकेची कामं लवकर उरका, डिसेंबरमध्ये...

December Holiday List: अवघे 6 दिवस बाकी, बँकेची कामं लवकर उरका, डिसेंबरमध्ये 13 दिवस बँका बंद

Subscribe

नोव्हेंबर महिना संपायला फक्त 6 दिवस शिल्लक आहेत आणि डिसेंबर म्हणजेच वर्षाचा शेवटचा महिना सुरू होणार आहे. नवीन वर्ष साजरे करण्याआधीच ख्रिसमसव्यतिरिक्त इतर अनेक प्रसंगी बँका डिसेंबरमध्ये बंद राहतील

नवी दिल्ली: RBI ने डिसेंबर महिन्यासाठी बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. वेगवेगळ्या राज्यांनुसार आणि शहरांनुसार बँकांना वेगवेगळ्या सुट्ट्या असतात. विशेषतः संबंधित राज्यातील सण किंवा तिथे होणार्‍या इतर कार्यक्रमांवर त्या सुट्ट्या अवलंबून असतात.

नोव्हेंबर महिना संपायला फक्त 6 दिवस शिल्लक आहेत आणि डिसेंबर म्हणजेच वर्षाचा शेवटचा महिना सुरू होणार आहे. नवीन वर्ष साजरे करण्याआधीच ख्रिसमसव्यतिरिक्त इतर अनेक प्रसंगी बँका डिसेंबरमध्ये बंद राहतील. अशा स्थितीत जर तुम्हाला पुढील महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असल्यास ते या महिन्यातच करून टाका, कारण पुढील महिन्यात एकूण 13 दिवस बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही.

- Advertisement -

सुट्टीची यादी पाहिल्यानंतरच बँकेत जा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जारी केलेल्या डिसेंबर 2022 च्या बँक हॉलिडे लिस्टनुसार, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांसह महिन्याच्या अर्ध्या दिवसात बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही. अशा परिस्थितीत ही सुट्ट्यांची यादी तपासून घराबाहेर पडणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.नाही तर तुम्ही बँकेत पोहोचाल आणि तेथे टाळे ठोकलेले पाहायला मिळेल.

या तारखांना बँकेला सुट्टी
डिसेंबर महिन्याच्या बँक हॉलिडे कॅलेंडरवर नजर टाकल्यास, आरबीआयने 3, 12, 19, 24, 26, 29, 30, 31 रोजी विविध राज्ये आणि शहरांमध्ये बँक हॉलिडे जाहीर केले आहेत, तर 4, 10 रविवार ही साप्ताहिक सुट्टी आहे. डिसेंबरचा दुसरा आणि चौथा शनिवार वगळता 11, 24, 25 रोजी सुट्टी असेल. यावेळी ख्रिसमसची सुट्टी म्हणजे 25 डिसेंबरलादेखील रविवार आहे.

- Advertisement -

बँक हॉलिडे वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदलतात
विशेष म्हणजे बँक हॉलिडे वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांमध्ये होणाऱ्या इतर कार्यक्रमांवरही अवलंबून असतात. म्हणजेच ते राज्य आणि शहरांमध्ये भिन्न आहेत. बँकांच्या शाखा बंद असूनही, तुम्ही तुमच्या घरच्या आरामात बँकिंगशी संबंधित काम ऑनलाईन करू शकता. ही सुविधा नेहमीच २४ तास कार्यरत राहील.


हेही वाचाः गुजरातमध्ये प्रचाराचा धुरळा, मोदी आज चार ठिकाणी घेणार सभा

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -