घरठाणे... म्हणून तो भर रस्त्यात विवस्त्र झाला

… म्हणून तो भर रस्त्यात विवस्त्र झाला

Subscribe

जादूटोणाचा प्रकार नसल्याची पोलिसांची माहिती

कल्याण । रविवारी रात्री 11 ते 11.30 च्या दरम्यान कल्याण पश्चिम येथील आग्रा रोड जवळील जय मल्हार हॉटेल समोर एका मानसिक संतुलन बिघडलेल्या इसमाची एका टोळक्याने थट्टा मस्करी केल्याने वाहतुकीच्या भर रस्त्यात संतुलन बिघडलेल्या इसमाने चिडून जात विवस्त्र होत रस्त्यावर कागद व केरकचरा पेटवण्याचा प्रयत्न केला. ही माहिती पोलिसांनी दिली असून जादूटोणा करण्याचा प्रकाराची चुकीची माहिती सोशल मीडियावर पसरवली जात असल्याचे महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनचे सीनियर इन्स्पेक्टर अशोक होनमाने यांनी सांगितले.

साधारण 55 ते 58 वयोगटातील मानसिक संतुलन बिघडलेल्या इसमाची आग्रा रोड येथे काही तरुणांनी चेष्टा मस्करी करण्याचा प्रकार रविवारी 11 ते 11.30 च्या दरम्यान केला होता. मानसिक संतुलन बिघडलेल्या या इसमाने आपल्या शरीरावरील हाफ पॅन्ट उतरवित विवस्त्र होत वाहतूक सुरू असलेल्या रस्त्यावरच कागद कचरा पेटवून आपला राग व्यक्त केला. सततची वाहतूक सुरू असणार्‍या भर रस्त्यात एखादा बुवा जादूटोणाचा प्रकार कसा करेल असा प्रश्न देखील आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

- Advertisement -

भर रस्त्यात विवस्त्र होत मानसिक संतुलन बिघडलेल्या या इसमाने रस्त्यावरील कागद व केरकचरा जमवित त्याला पेटवून दिल्याने याबाबत एका सामाजिक कार्यकर्त्याने पोलिसांना भ्रमणध्वनी करत घडलेली माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वेडसर असणार्‍या इसमाची अवस्था बघून त्याला कपडे घालण्यास भाग पाडले आणि पोलिसही तेथून निघून गेले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -