घरमहाराष्ट्रमहसूल विभागात होणार ४१२२ पदांची भरती, रिक्त तलाठी पदे भरणार

महसूल विभागात होणार ४१२२ पदांची भरती, रिक्त तलाठी पदे भरणार

Subscribe

मुंबई – महसूल विभागाअंतर्गत असलेल्या तलाठ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. ही पदे लवकरच भरण्यात येणार आहे. येत्या काही काळात एकूण ४१२२ पदांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये १०१२ रिक्त असलेली तलाठी पदे आणि ३११० नव्या निर्माण झालेली पदे भरण्यात येणार आहेत.

हेही वाचा आई वडिलांचे छत्र हरपलेल्यांसाठी मदतीचे शेकडोचे हात सरसावले

- Advertisement -

तलाठी पदे रिक्त असल्याने तीन ते चार गावांसाठी एक तलाठी पदावर आहे. त्यामुळे ग्रामसेवेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे रिक्त पदे भरण्याची मागणी राज्य तलाठी संघाच्यावतीने करण्यात आली आहे. त्यानुसार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईमध्ये बैठक घेतली. या बैठकीसाठी राज्यातील तलाठ्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत रिक्त पदांसाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना विखे पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

हेही वाचा – कोरोना काळातील कंत्राटी आरोग्य सेविकांना कायम करण्याचा निर्णय, ५९७ कर्मचाऱ्यांना दिलासा

- Advertisement -

कोणत्या विभागात किती पदे भरणार?

नाशिक – १०३५
औरंगाबाद – ८७४
कोकण – ७३१
नागपूर – ५८०
अमरावती – १८३
पुणे – ७४६

मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामावली प्रमाणित करून त्यांदर्भातील सामाजिक आरक्षण, समांतर आरक्षणाचा तपशील मागवण्यात आला आहे. त्यामुळे सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -