घरदेश-विदेशVideo : भाजपाच्या कार्यकर्त्यांना पाहून राहुल गांधींनी दिली फ्लाईंग किस

Video : भाजपाच्या कार्यकर्त्यांना पाहून राहुल गांधींनी दिली फ्लाईंग किस

Subscribe

झालावाड – भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून बरेच चर्चेत आहेत. या यात्रेच्या निमित्ताने ते देशभरातील विविध लोकांशी, संस्थांशी बोलत आहेत. राज्यातील प्रश्न जाणून घेत सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे त्यांच्या या यात्रेला सत्ताधाऱ्यांकडून प्रचंड विरोध आणि टीका होत असतानाही राहुल गांधी यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना पाहून फ्लाईंग किस केली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – देश तोडणाऱ्यांच्या समर्थनार्थ भारत जोडो यात्रा; स्वरा भास्करच्या सहभागावर भाजपाची टीका

- Advertisement -

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ४ डिसेंबर रोजी राजस्थानात पोहोचली. आज सकाळी ही यात्रा झालावाड शहराच्याही पुढे पोहोचली आहे. या दरम्यान, झालावाड येथील भाजपाच्या कार्यालयाच्या छतावर भाजपाचे काही कार्यकर्ते हातात भाजपाचा झेंडा घेऊन उभे होते. हे राहुल गांधींनी पाहिलं. त्यांनी लागलीच भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या दिशेने हात उंचावून फ्लाईंग किस केले. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत मुख्यमंत्री अशोक गहलोत, प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख गोविंद सिंह डोटासरा, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह अनेक नेते आणि मंत्री उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ यशस्वी करणाऱ्यांचे नाना पटोले, थोरातांनी पत्राद्वारे मानले आभार

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -