घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमहावितरण अधिकार्‍यालाच एसीबीचा 'शॉक', १७ हजारची लाच घेताना रंगेहात अटक

महावितरण अधिकार्‍यालाच एसीबीचा ‘शॉक’, १७ हजारची लाच घेताना रंगेहात अटक

Subscribe

नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पुन्हा एक मोठी कारवाई करत वीज वितरण महामंडळाच्या (एमएसईबी) अधिकार्‍याला लाच घेताना रंगेहात जाळ्यात सापडला. महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय मारुति घालपे यांस १७ हजारची लाच घेताना अटक करण्यात आली आहे.नवीन ट्रान्सफार्मर आणि वीज जोडणीच्या बदल्यात घालपे याने बिल्डरकडे लाचेची मागणी केली होती. याबाबत बांधकाम व्यवसायिकाने तक्रार दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत घालपे याला रंगेहात अटक केली आहे.

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरातील एका नव्याने बांधण्यात आलेल्या रहिवासी इमारतीमध्ये वीज वितरणचे ट्रान्सफार्मर बसवायचे होते. तसेच त्याठिकाणी नव्याने तयार झालेल्या फ्लॅट्ससाठीही नव्याने वीज जोडणी करायची होती. हे काम महावितरणचा लाचखोर अतिरिक्त कार्यकारी अभियंता घालपे याच्या अत्यखारीत होते. सदर कामासाठी घालपे याने वीस हजार रुपयांची मागणी केली. इमारतीच्या ४१ फ्लॅट्सला नवीन वीज जोडणी तसेच ट्रान्सफार्मर बसवण्याच्या बदल्यात प्रत्येक फ्लॅट मागे ५०० रुपये याप्रमाणे २१ हजार ५०० रुपयांची मागणी घालपे याने बांधकाम व्यवसायिकाकडे केली. याबाबत तडजोड करून अखेर लाचेची रक्कम १७ हजार रुपये निश्चित करण्यात आली. बांधकाम व्यवसायिकाने याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली. लाचलुचपत विभागानेही पडताळणी करत सापळा रचला आणि घालपे याला १७ हजारची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे महावितरण विभागात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -