घरअर्थजगत४० कोटी जनता दारिद्र्यरेषेच्या बाहेर, राज्यसभेत सरकारकडून माहिती

४० कोटी जनता दारिद्र्यरेषेच्या बाहेर, राज्यसभेत सरकारकडून माहिती

Subscribe

नवी दिल्ली – देशातील ४० कोटी जनता दारिद्र्यरेषेच्या बाहेर आली असल्याची माहिती आज राज्यसभेत योजना मंत्रालयाचे राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी दिली. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या (United Nations Development Program) जागतिक बहुआयामी गरीबी निर्देशांकाचा (Global Multidimensional Poverty Index) हवाला देत ही माहिती आज सादर करण्यात आला. तर, भारतात २५.०१ टक्के लोकसंख्या गरीब असल्याचंही त्यांनी सांगितलं.


राव इंद्रजीत सिंह म्हणाले की, भारतात ऑक्सफोर्ड पॉवर्टी अॅण्ड ह्युमन डेव्हलोपमेंट इनिशिएटीव्ह आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाद्वारे जारी केलेल्या वैश्विक बहुआयामी गरीबी निर्देशांक २०२२ अहवालानुसार २००५-०६ ते २०१९-२१ दरम्यान ४१ कोटी ५० लाख लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. Global Multidimensional Poverty Index हा अहवाल राष्ट्रीय परिवार स्वास्थ्य कुटुंब -५ वर आधारीत होता. तसंच, देशातील गरिबी कमी होण्याकरता सरकारडून पावलं उचलली जात असल्याचंही सांगण्यात आलं.

- Advertisement -

गेल्या काही वर्षांपासून महागाई वाढत आहे. बेरोजगारीनेही उच्चांक गाठला आहे. त्यामुळे गरिबी वाढली असल्याचं बोललं जात आहे. मात्र, Global Multidimensional Poverty Index नुसार देशातील गरिबी कमी झाली आहे. तसंच, उर्वरित गरिब जनतेला गरिबी रेषेच्या बाहेर काढण्याकरता सरकार पातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती राव इंद्रजीत सिंह यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -