घरदेश-विदेशजम्मू-काश्मीरमध्ये ३ दहशतवाद्यांना कंठस्थान

जम्मू-काश्मीरमध्ये ३ दहशतवाद्यांना कंठस्थान

Subscribe

काश्मीरच्या खोऱ्यातून दहशतवाद्यांचे उच्चाटन करण्यासाठी सध्या लष्कराकडून 'ऑपरेशन ऑलआऊट' मोहीम राबवली जात आहे.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात आज ३ दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले. पुलनावा जिल्ह्यामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज पहाटे या चकमकीला सुरुवात झाली. उपलब्ध माहितीनुसार, ही चकमक अजूनही सुरु असून आतापर्यंत या कारवाईमध्ये ३ दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आले आहे. तर दुसरीकडे या कारवाईमध्ये एका जवानाला वीरमरण आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या लष्कराकडून ‘ऑपरेशन ऑलआऊट’ मोहीम राबवली जात आहे. काश्मीरच्या खोऱ्यातून दहशतवाद्यांचे उच्चाटन करण्यासाठी या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत आजवर अनेक दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात आले आहे. काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्याचे दहशतवाद्यांचे कोणतेही प्रयत्न खपवून घेतले जाणार नाही, अशी या मोहिमेमागची लष्कराची भूमिका आहे.


याच मोहिमेअंतर्गत आज आज पहाटे पुलवामा परिसरात लष्करी जवानांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली. या कारवाईमध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. मात्र दुर्देवाने या चकमकीत दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात लष्कराच्या एका जवानाला वीरमरमण प्राप्त झाले. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, पुलवामा परिसरातील ही कारवाई अजून संपली नसून याविषयी अधिक माहिती प्राप्त झालेली नाही. काही दिवसांपूर्वीच काश्मिरच्या शोपिया जिल्ह्यामध्ये अशीच एक चकमक झाली होती. ज्यामध्ये दहशतवाद्यांनी एका पोलीस चौकीवर केलेल्या गोळीबारात ३ पोलिसांचा मृत्यू झाला होता. या चकमकीत अब्दुल मजीद, मंजूर अहमद आणि मोहम्मद अमीन या ३ पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -