घरमनोरंजनहॉरर किंग तुलसी रामसे यांचे निधन

हॉरर किंग तुलसी रामसे यांचे निधन

Subscribe

९०च्या दक्षकातील हॉरर चित्रपटाचे किंग तुलसी रामसे काळाच्या पडद्याआड झाले आहेत. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले आहे.

९० च्या दक्षकातील हॉररचित्रपटाचे किंग तुलसी रामसे यांचे निधन झाले आहे. ते ७७ वर्षाचे होते. हृदयविकाराचा झटक्यामुळे त्यांची प्राणज्योत मावळली. तुलसी रामसे यांना छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे. हिंदी सिनेसृष्टीत हॉरर चित्रपटांचा ट्रेंड आणणारे आणि रुजवणारे निर्मता म्हणून ते ओळखले जात होते. पुराना मंदिर, तहखाना, वीराना, बंद दरवाजा हे भयपट खूप गाजले होते.

- Advertisement -

कोण होते तुलसी रामसे

तुलसी रामसे यांना सहा भाऊ आहेत. त्यांचे चित्रपट रामसे ब्रदर्स नावाने प्रदर्शित होत होते. हॉरर, अॅक्शन, रोमान्स आणि गाणी या सर्व गोष्टी त्यांच्या चित्रपटांमध्ये होत्या. हॉरर चित्रपाटतून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास रामसे ब्रदर्सने केली. भूत, प्रेत, चेटकीन त्यांच्या चित्रपटातून बॉलिवूडला मिळाली. त्यांनी अनेक बी ग्रेड चित्रपटांची निर्मिती केली.

 

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -