घरटेक-वेकभारताचा 'सॉफ्टवेअर बॉय', १३व्या वर्षी दुबईत कमावलं नाव

भारताचा ‘सॉफ्टवेअर बॉय’, १३व्या वर्षी दुबईत कमावलं नाव

Subscribe

अदित्ययन राजेश हा भारताचा सॉफ्टवेअर बॉय आहे!! अवघ्या तेरा वर्षाचा असलेल्या आदित्यच्या मोबाईल सॉफ्टवेअर अॅप्लिकेशनला दुबईमध्ये बक्षीस मिळालं आहे.

अदित्ययन राजेश हा भारताचा सॉफ्टवेअर बॉय आहे!! आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ही कोणती नवी उपाधी. तर, अदित्ययन राजेशनं दुबईमध्ये जात भारतातं नाव रोषण केलं आहे. कारण, अवघ्या तेरा वर्षाचा असलेल्या आदित्यच्या मोबाईल सॉफ्टवेअर अॅप्लिकेशनला दुबईमध्ये बक्षीस मिळालं आहे, सध्या तरी दुबईमध्ये त्याचीच चर्चा आहे बॉस!! विशेष बाब म्हणजे अवघा नऊ वर्षाचा असताना आदित्ययननं हे सॉफ्टवेअर तयार केलं. ते देखील एक आवड किंवा छंद म्हणून. पण, ४ वर्षानंतर मात्र त्याच्या या सॉफ्टवेअरला दुबईमध्ये बक्षीस मिळालं आहे. साता समुद्रापार देशाचं नाव काढणारा आदित्ययन केरळचा आहे. शिवाय, त्याची स्वत:ची कंपनी देखील आहे बरं का!! आणि त्या कंपनीचं नाव आहे Trinet Solutions !! या कंपनीच्या माध्यमातून आदित्य लोगो आणि वेबसाईट डिझाईनचं काम करतो.

वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षीच आदित्ययन आणि संगणकाशी मैत्रि झाली. सुरूवातीला त्यानं लहान मुलांसाठी वेबसाईट तयार केली. तुमच्या मनात आता एक प्रश्न नक्की निर्माण झाला असेल, की आदित्ययनच्या कंपनीमध्ये काम कोण करतं? तर आदित्ययनच्या कंपनीमध्ये त्याच्याच शाळेत शिकणारे मित्र काम करतात. सध्या आदित्यकडे १२ क्लायंट आहेत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सध्या वय कमी असल्यामुळे आदित्य कंपनीचा मालक होऊ शकत नाहीत. पण वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर आदित्य एका कंपनीचा मालक असेल!!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -