घरताज्या घडामोडीनिवासी डॉक्टरांचा संप मागे पण वीज कर्मचारीही संपावर; रुग्णालयातील रुग्णांच्या हालात भर

निवासी डॉक्टरांचा संप मागे पण वीज कर्मचारीही संपावर; रुग्णालयातील रुग्णांच्या हालात भर

Subscribe

एकिकडे डॉक्टरांचा संप मिटला असला तरी, दुसरीकडे वीज कर्मचारी संपावर गेल्याने रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण राज्यभरात अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णांवरील उपचारासाठी आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी वीज महत्त्वाची असते. त्यामुळे रुग्णालयात वीज नसल्यास रुग्णांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२०२३ वर्षाच्या सुरूवातीला महाराष्ट्रातील नागरिकांना डॉक्टर आणि वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा सामना करावा लागला होता. अखेर राज्यातील निवासी डॉक्टरांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मागील दोन दिवसांपासून पुकारलेला संप मंगळवारी रात्री उशिरा मागे घेतला. मात्र, काल रात्रीपासून राज्यातील वीज कर्मचाऱ्यांनी तीन दिवसीय संपाची हाक दिली. त्यामुळे एकिकडे डॉक्टरांचा संप मिटला असला तरी, दुसरीकडे वीज कर्मचारी संपावर गेल्याने रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण राज्यभरात अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णांवरील उपचारासाठी आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी वीज महत्त्वाची असते. त्यामुळे रुग्णालयात वीज नसल्यास रुग्णांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Resident doctors strike back but electricity workers also on strike Emphasis on the condition of hospital patients)

निवासी डॉक्टरांनी (मार्ड) मंगळवारी म्हणजेच दुसऱ्या दिवशीही संप सुरू ठेवला होता. त्यामुळे काही शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्याने रुग्णांचे हाल झाले होते. तसेच, आज वीज कर्मचारी संपावर गेल्याने राज्यातील ग्रामीण भागाला त्याचा सर्वाधिक फटका बसत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णालयांमधील रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
शहरी भागातील रुग्णालयात वीज गेल्यास त्याला पर्याय म्हणून जनरेटर आणि इनव्हर्टर असतात. मात्र, ग्रामीण भागांतील बहुतांश रुग्णालयात जनरेटर आणि इनव्हर्टर नसतात. त्यामुळे अशा रुग्णालयांमध्ये रुग्णाचे हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisement -

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागात बत्ती गूल झाली आहे. रत्नागिरी शहर वगळता राजापूर, लांजा, संगमेश्वर, चिपळूण, खेड, दापोली, गुहागर, मंडणगड या तालुक्यातील वीज गेली आहे. त्यामुळे अनेक व्यवसायावर याचा परिणाम दिसून येत आहे.

राज्यातील वीज कर्मचाऱ्यांनी तीन दिवसीय संपाची हाक दिली आहे. खासगीकरणाला विरोध (Mahavitaran Privatization) करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली. अदानी समूहाला (Adani Group) वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी हा संप पुकारला आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या या संपाचा फटका राज्यातील अनेक जिल्ह्यांना बसला. काही ठिकाणी वीज नसल्याने नागरिकांची गैरसोय झाल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्रात अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण मराठीतून सुरू करणार; फडणवीसांची घोषणा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -