घरसंपादकीयदिन विशेषनव्या संधींसाठी प्रवासी भारतीय दिन

नव्या संधींसाठी प्रवासी भारतीय दिन

Subscribe

भारतामध्ये मोठ्या संख्येने लोक शिक्षणासाठी तसेच नोकरी व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी जगातील विविध देशांमध्ये गेलेले आहेत. त्यातील बरेच भारतीय तिथेच स्थायिक झालेले आहेत. या भारतीयांनी या देशांमध्ये राहताना आपली प्रगती करून घेतलीच, पण त्याचसोबत ते राहत असलेल्या देशांच्या विकासामध्ये मौलिक योगदान दिले आहे.

भारतामध्ये मोठ्या संख्येने लोक शिक्षणासाठी तसेच नोकरी व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी जगातील विविध देशांमध्ये गेलेले आहेत. त्यातील बरेच भारतीय तिथेच स्थायिक झालेले आहेत. या भारतीयांनी या देशांमध्ये राहताना आपली प्रगती करून घेतलीच, पण त्याचसोबत ते राहत असलेल्या देशांच्या विकासामध्ये मौलिक योगदान दिले आहे. अशा जगभरात पसरलेल्या अनिवासी भारतीयांना आपला मूळ देश असलेल्या भारताशी जोडून घेण्यासाठी एक नवा विचार पुढे आला. त्यातूनच प्रवासी भारतीय दिन या संकल्पनेचा जन्म झाला. भारत सरकारकडून दरवर्षी ९ जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो.

पहिला प्रवासी भारतीय दिवस ९ ते ११ जानेवारी या कालावधीत २००३ मध्ये साजरा करण्यात आला होता. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कल्पनेतून या दिवसाची सुरुवात करण्यात आली. प्रवासी भारतीय दिनी विदेशात राहून विविध क्षेत्रात मौलिक योगदान देणार्‍या भारतीयांना प्रवासी भारतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. विदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांच्या मनात भारताविषयी काय भावना आहे. जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारताने आणखी काय करायला हवे, भारत आणि इतर देश यांच्यामध्ये काय समान धागे आहेत, अशा अनेक गोष्टींचे वैचारिक आदान प्रदान व्हावे, त्यासाठी हे प्रवासी दिन हे व्यासपीठ आहे. यामध्ये विशेषत: तरुण वर्गाला अनिवासी भारतीयांकडून मार्गदर्शन केले जाते. विदेशातील नव्या संंधींबद्दल यांना माहिती मिळते. अनिवासी भारतायींच्या माध्यमातून भारतात नवी व्यावसायिक गुंतवणूक आकर्षित करण्याचाही प्रयत्न केला जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -