घरमहाराष्ट्रवडीलांनी केली मुलाविरोधात तक्रार

वडीलांनी केली मुलाविरोधात तक्रार

Subscribe

राग अनावर झाल्यांने मुलांने वडीलांवर मोबाईल फोन फेकून मारल्याने वडील किरकोळ जखमी झाले आहेत. वडीलांने मुलाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मुलांमध्ये सध्या दिवसेंदिवस मोबाईलचं आकर्षण वाढतंय. आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या मोबाईलचा वापर हा संपर्कासाठी किंवा संवादासाठी करण्यात येतो हे सगळ्यांना माहितीच आहे. मात्र एका तरुणांने मोबाईलचा वापर मारण्यासाठी केलाची घटना समोर आली आहे. चिंचवड येथे एका तरुणांचा वाद झाल्याने वडीलांवर मोबाईल फेकून मारल्याने वडील त्यात जखमी झाले असून त्यांनी मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नेमके काय घडले?

चिंचवडच्या छत्रपती शिवाजी पार्क भागात राळे हे कुटुंब राहते. या कुटुंबातील दिगंबर राळे (५२) यांचा त्यांच्या मुलाशी सूरज राळे (२५) सोबत वाद झाला होता. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु होते. १७ डिसेंबर रोजी देखील मुलगा आणि वडील यांच्यात वाद झाला. या दोघांचे भांडण सुरु असतानाच सूरजला राग अनावर झाला आणि त्यांनी आपल्या हातातील मोबाईल वडीलांवर फेकून मारला. यामध्ये दिगंबर राळे हे किरकोळ जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर त्यांनी चिखली पोलीस स्थानक गाठले आणि मुलाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -