घरताज्या घडामोडीभारतातील पहिली नोजल कोविड लस उपलब्ध; जाणून घ्या किंमत किती?

भारतातील पहिली नोजल कोविड लस उपलब्ध; जाणून घ्या किंमत किती?

Subscribe

भारत बायोटेक निर्मित ‘इन्कोव्हॅक’ नोजल कोविड लस आजपासून उपलब्ध झाली. ‘इन्कोव्हॅक’ लस ही भारतातील पहिली नोजल कोविड लस आहे. भारत सरकारने 23 डिसेंबर रोजी या लसीला मान्यता दिली होती.

भारत बायोटेक निर्मित ‘इन्कोव्हॅक’ नोजल कोविड लस आजपासून उपलब्ध झाली. ‘इन्कोव्हॅक’ लस ही भारतातील पहिली नोजल कोविड लस आहे. भारत सरकारने 23 डिसेंबर रोजी या लसीला मान्यता दिली होती. सर्वप्रथम, नाकाची लस खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. (World first nasal vaccine for Covid 19 iNCOVACC launched on Republic Day)

खासगी रुग्णालयांत ‘इन्कोव्हॅक’ नोजल कोविड लसीसाठी ८०० रुपये मोजावे लागणार आहेत. या लसीचे बुकिंग फक्त Cowin पोर्टलवरून केले जाणार आहे. तसेच, कोवॅक्सिन आणि कोविशील्ड सारख्या लस घेणाऱ्यांना इंट्रानासल लस बूस्टर डोस म्हणून दिली जाईल.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी ही नेझल व्हॅक्सिन (Nasal Vaccine) ‘इनकोव्हॅक’ (iNCOVACC) लाँच केली आहे.

हैदराबादमधील भारत बायोटेकने वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या सहकार्याने ही लस विकसित केले आहे. नाकातून देण्यात येणारी ही लस बुस्टर डोस म्हणून दिली जाणार आहे.

- Advertisement -

बुस्टर डोस म्हणून सध्या इंजेक्शनद्वारे लसीकरण केले जात आहे. या लसीला इंट्रामस्क्युलर लस म्हणतात. नाकाची लस ही नाकातून दिली जाते. तिला इंट्रानासल लस म्हणतात. म्हणजेच, ते इंजेक्शनने देण्याची गरज नाही किंवा तोंडावाटे लसीप्रमाणे दिली जात नाही. हे स्प्रेसारखे आहे. शिवाय, 4 थेंबही पुरेसे नेझल लस पहिली लस म्हणून देखील वापरली जाऊ शकते. भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष डॉ. कृष्णा एला यांनी सांगितले की, पोलिओप्रमाणेच या लसीचे 4 थेंबही पुरेसे आहेत. दोन्ही नाकपुड्यांमध्ये दोन थेंब टाकावेत.


हेही वाचा – देशाच्या विकास प्रक्रीयेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनन्यसाधारण महत्त्व : महापालिका आयुक्त

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -