घरमनोरंजनचित्रपटाचं नाव 'इंडियन पठाण' असायला हवं...; कंगनाची 'पठाण'वर सडकून टीका

चित्रपटाचं नाव ‘इंडियन पठाण’ असायला हवं…; कंगनाची ‘पठाण’वर सडकून टीका

Subscribe

बॉलिवूडची धाकड गर्ल अभिनेत्री कंगना रनौत सतत विविध कारणांमुळे चर्चेत असते. कंगना अनेकदा सोशल मीडियावरुन बॉलिवूड कलाकार आणि बॉलिवूड चित्रपटांविरोधात भाष्य करताना दिसते. नुकत्याच एक-दोन दिवसांपूर्वी कंगना रनौतने अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाबाबत आपलं मत व्यक्त केलं होतं. यावेळी ती ‘पठाण’ चित्रपट खूप छान आहे असं म्हणाली होती. कंगनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. दरम्यान, अशातच आता कंगनाने ‘पठाण’ चित्रपटाबाबत एक ट्वीट केलं आहे. ज्यात ती चित्रपटावर टीका करताना दिसत आहे.

आधी कौतुक आता टीका ‘पठाण’ चित्रपटाबाबत बदललं कंगनाचं मत

- Advertisement -

‘पठाण’ चित्रपटाच अनेकजण कौतुक करत आहेत, अनेक चित्रपटगृहांबाहेर ‘पठाण’च्या हाऊसफुलचे बोर्ड लागले आहेत. नुकत्याच एक-दोन दिवसांपूर्वी कंगना रनौतने ‘पठाण’ चित्रपटाच कौतुक केलं होतं. मात्र, त्याच कंगनाने आता चित्रपटावर टीका करायला सुरुवात केली आहे. ट्वीटरवर एक ट्वीट शेअर करत कंगनाने लिहिलंय की, जे लोक या गोष्टीचा दावा करत आहेत की, “पठाण चित्रपट म्हणजे द्वेषावर प्रेमाचा विजय आहे. मी सहमत आहे परंतु, हे कोणाचं प्रेम आणि कोणाचा द्वेष आहे? कोण चित्रपटाची तिकीटं खरेदी करत आहे आणि त्याला हिट करत आहे? हो, हे भारताचे प्रेम आहे जिथे 80 % लोक हिंदू आहेत आणि तरीही इथे पठाण नावाचा चित्रपट चालत आहे. पठाण चित्रपटात आपला शत्रू देश पाकिस्तान आणि ISIS वर प्रकाश टाकण्यात आला आहे. तो चित्रपट यशस्वी होत आहे. ही भारतातील स्क्रिप्ट आहे.”

कंगनाने पुढे लिहिलं की, “ज्या लोकांना खूप अपेक्षा आहे… त्यांनी कृपया एक गोष्ट लक्षात ठेवा की, पठाण हा केवळ एक चित्रपट आहे. पण इथे फक्त जय श्री राम हाच आवाज घुमणार.”

- Advertisement -

पुढे कंगना म्हणाली की,”माझा विश्वास आहे की, भारतीय मुस्लीम देशभक्त आहेत आणि अफगाण पठाणांपेक्षा खूप वेगळे आहेत. मुख्य म्हणजे भारत कधीही अफगाणिस्तान होणार नाही, अफगाणिस्तानमध्ये काय चालले आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे, तिथली परिस्थिती नरकासारखी आहे. त्यामुळे पठाण पाहिल्यानंतर त्याचं नाव इंडियन पठाण असायला हवं, असं मला वाटतं,” असं कंगना म्हणाली.


हेही वाचा :

झी टॉकीजतर्फे दिमाखात रंगला ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ पुरस्कार सोहळा

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -