घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'ज्या ठिकाणचे कुंकु लावले त्या ठिकाणी सुखाने नांदा'; पालकमंत्री दादा भुसे यांचा...

‘ज्या ठिकाणचे कुंकु लावले त्या ठिकाणी सुखाने नांदा’; पालकमंत्री दादा भुसे यांचा अव्दय हिरेंना टोला

Subscribe

नाशिक : ‘गेल्या घरी सुखी राहा, ज्या ठिकाणचे कुंकू लावले त्या ठिकाणी सुखाने नांदावे’ असे म्हणत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी अद्वय हीरे यांना टोला लगावला आहे. त्यामुळे भुसे यांनी काढलेला हा चिमटा अद्वय हिरे यांच्या राजकीय प्रवासाबद्दल हा टोला असल्याची चर्चा होऊ लागली आहे. हिरे यांच्या कुटुंबाचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि आता ठाकरे गट असा पक्षीय प्रवास होणार आहे. त्यामुळे हिरे यांच्याबद्दल अवघ्या दोन वाक्यात बोलून गेलेल्या दादा भुसे यांच्या प्रतिक्रियेवरुन राजकीय वातावरण तापले आहे.

भाजपला सोडचिठ्ठी देऊन ठाकरे गटात प्रवेश निश्चित झालेल्या आणि शिंदे गटाच्या दादा भुसे यांच्या विरोधात दंड थोपटलेल्या अद्वय हिरे यांना दादा भुसे चिमटा काढला आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या विरोधात राजकीय आखड्यात दंड थोपटलेल्या अद्वय हिरे यांच्याबद्दल दादा भुसे यांनी दिलेली प्रतिक्रिया नाशिकच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरू लागली आहे. शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर दादा भुसे यांच्यावर टिकेची एकही संधी न सोडलेले अद्वय हिरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशावर भुसे समर्थक टीका करू लागले आहे. अद्वय हिरे यांच्या सोशल मीडियावरील शिवसेनेच्या विरोधातील पोस्ट आणि मिम्स व्हायरल केल्या जात आहे. त्यातच दादा भुसे यांची प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे. हिरे कुटुंब संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून सहकार आणि शिक्षण क्षेत्रात कायमचं अग्रेसर राहीले आहे, त्यांच्याच राजकीय अस्तित्वाला भुसे यांनी काही वर्षांपूर्वी सुरुंग लावले होते. दादा भुसे यांच्या विरोधातील भविष्यातील ठाकरे गटाचे उमेदवार अद्वय हिरे हेच राहणार असल्याने आत्तापासूनच भुसे विरुद्ध हिरे असा नवा सामना पुन्हा सुरू झाला आहे. हिरे आणि भुसे यांच्यातील राजकीय संघर्ष मालेगावात आता नव्याने रंगू लागला असून अद्वय हिरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशावरुन मालेगावमधील राजकीय वातावरण तापले आहे.

- Advertisement -
हीरे अस्तित्वाच्या शोधात

सयुक्त महाराष्ट्र होण्यापूर्वी पासून हीरे कुटुंब नाशिकसह महाराष्ट्राच्या आणि विशेषतः मालेगाव तालुक्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले आहे. त्यांच्या मागील तीन पिढ्यांनी राज्यात मंत्रिपदे सांभाळली आहेत. तसेच त्यांचं मालेगावात एकछत्री अंमल राहिले आहे. सहकारी संस्थाच्या माध्यमातून त्यांनी आपली पकड मजबूत ठेवली होती. मात्र २००४ साली दादा भुसे यांनी हिरेंच्या मालेगावतील वर्चस्वाला सुरुंग लावत प्रशांत हीरे यांना पराभूत केले. आणि त्यानंतर सलग ४ निवडणुका ते मालेगावचा गड राखून आहेत. २००४च्या पराभवानंतर राजकरणात आलेली हिरेंची चौथी पिढी अद्यापही अस्तित्वाच्या शोधात असल्याचे दिसते. यासाठी अद्वय हीरे आणि अपूर्व हीरे या बंधूंनी मागील काही वर्षात कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि आता ठाकरे गट आणि मध्यंतरी स्थानिक आघाडी असा राजकीय प्रवास केला आहे. आता ठाकरे गटाच्या माध्यमातून त्यांना सुर गवसणार का हे बघणे महत्वाचे असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -