घरताज्या घडामोडीViral Video : गुलमर्गमध्ये भीषण हिमस्खलन; दोघांचा मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती

Viral Video : गुलमर्गमध्ये भीषण हिमस्खलन; दोघांचा मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती

Subscribe

जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्ग येथील अफ्रावत शिखरावर प्रचंड हिमस्खलन झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हिमस्खलनाचा गुलमर्ग येथील लोकप्रिय स्कीइंग रिसॉर्टला मोठा फटका बसला आहे.

जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्ग येथील अफ्रावत शिखरावर प्रचंड हिमस्खलन झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हिमस्खलनाचा गुलमर्ग येथील लोकप्रिय स्कीइंग रिसॉर्टला मोठा फटका बसला आहे. यामध्ये दोन परदेशी स्कीअरचा मृत्यू झाला असून, अनेक भारतीय अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Two die as massive avalanche hits Afarwat peak in Gulmarg)

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळच्या सुमारास बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्ग येथील अफ्रावत शिखरावर प्रचंड हिमस्खलन झाले. अचानक झालेल्या हिमस्खलनात परदेशी स्कीअर अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

हिमस्खलन झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या घटनेत आतापर्यंत दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला असून, १९ परदेशी पर्यटकांना वाचवण्यात यश आले आहे, अशी माहिती बारामुल्ला पोलिसांनी दिली आहे.

या घटनेनंतर बारामुल्ला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलमर्ग येथील प्रसिद्ध स्कीइंग रिसॉर्टच्या वरील भागात असणाऱ्या अफ्रावत शिखरावर हिमस्खलन झाले आहे. सध्या बारामुल्ला पोलिसांसह इतर यंत्रणांकडून बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे, गुलमर्गचा आफ्रावत क्षेत्र हा एक वादग्रस्त हिमालयीन प्रदेश आहे. ज्यावर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी पूर्ण दावा केला आहे.


हेही वाचा – Union Budget 2023 : अर्थसंकल्पात शिक्षण, रोजगार, कौशल्य विकासासाठी मोठ्या घोषणा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -