घरमनोरंजन30 मार्च नाही तर एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार नागराज मंजुळेंचा 'घर, बंदूक,...

30 मार्च नाही तर एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार नागराज मंजुळेंचा ‘घर, बंदूक, बिरयाणी’ चित्रपट

Subscribe

निर्माते नागराज मंजुळे यांचा बहुचर्चित असा 'घर, बंदूक, बिरयाणी' या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. ३० मार्च या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार होता. पण आता या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.

निर्माते नागराज मंजुळे हे लवकरच एक नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘घर, बंदूक, बिरयाणी’ असे मंजुळेंच्या नव्या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटामध्ये नागराज मंजुळे यांच्यासह अभिनेते सयाजी शिंदे आणि अभिनेता आकाश ठोसर यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट मार्च महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 30 मार्चला प्रदर्शित करण्यात येणार होता. याबाबतची माहिती स्वतः नागराज मंजुळे यांच्याकडून देण्यात आली होती. पण आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याचे नागराज मंजुळे यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितले आहे.

‘सैराट’, ‘फँड्री’, ‘नाळ’, ‘झुंड’ या चित्रपटांमुळे नागराज मंजुळे यांच्या नव्या चित्रपटाची प्रेक्षकांना नेहमीच आतुरता लागलेली असते. त्यामुळे मंजुळे यांचा नवा चित्रपट ‘घर, बंदूक, बिरयाणी’ कधी लवकर प्रदर्शित होतो याबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती. मार्च महिन्याच्या अखेरीस हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने चाहत्यांमध्ये आनंद पाहायला मिळाला. पण आता हा चित्रपट 30 मार्च ऐवजी 7 एप्रिलला प्रदर्शित करण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सुशांत चौगुले ठरला ‘आरएमभट श्री’ चा मानकरी

दरम्यान, मार्च महिन्याच्या अखेरीस अभिनेता अजय देवगण याचा ‘भोला’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे नागराज मंजुळे यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलल्याचे बोलले जात आहे. पण नेमके याच कारणामुळे नागराज मंजुळे यांनी आपल्या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले आहे का? हे कळू शकलेले नाही. भोला या चित्रपटामध्ये अजय देवगण यांच्यासोबत अभिनेत्री तब्बू हि प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

- Advertisement -

‘घर, बंदूक. बिरयाणी’ या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्यासोबत सयाजी शिंदे एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याची माहिती देताना नागराज मंजुळे यांनी लिहिले आहे की, “आशेच्या भांगेची नशा भारी ‘घर बंदूक बिरयानी’ आता 7 एप्रिल 2023 ला…जाळ धूर आन धमाका…संगटच…GBB च्या नावानं चांगभलं !”. दरम्यान, आता प्रेक्षकांना हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -