घरसंपादकीयदिन विशेषचित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके

चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके

Subscribe

दादासाहेब फाळके यांचा आज स्मृतिदिन. दादासाहेब हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक, भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथाकार होते. ते चित्रपट महर्षी म्हणूनही ओळखले जातात. त्यांचा जन्म ३० एप्रिल १८७० रोजी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे झाला. मराठा हायस्कूल, मुंबई येथे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १८८५ मध्ये त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथून एक वर्षाचा चित्रकलेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी तैलरंगचित्रण, जलरंगचित्रण, वास्तुकला आणि नमुना प्रतिरूपण (मॉडेलिंग) यामध्ये प्रावीण्य मिळवले (१८९०).

१९०८ मध्ये त्यांनी लोणावळ्याला ‘फाळके एनग्रेव्हिंग अँड प्रिंटिंग प्रेस (वर्क्स)’ ही संस्था सुरू केली. १९०९ मध्ये दादासाहेब जर्मनीहून तीनरंगी मुद्रणप्रक्रियेचे अद्ययावत तांत्रिक शिक्षण घेऊन भारतात परतले व ही संस्था त्यांनी भरभराटीस आणली. याचदरम्यान त्यांनी मुंबईमध्ये लाईफ ऑफ जिझस ख्राईस्ट (म. शी. ‘ख्रिस्ताचे जीवन’) हा मूक चित्रपट पाहिला आणि त्यांच्या आयुष्यातले ध्यासपर्व सुरू झाले.

- Advertisement -

मुंबई (दादर) येथे फाळके चित्रपटनिर्मितिगृहाची स्थापना केली आणि सहा महिन्यांत मुंबईच्या कोरोनेशन चित्रपटगृहामध्ये त्यांनी निर्मिलेला ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला भारतीय बनावटीचा मराठी पूर्ण बोलपट प्रदर्शित झाला (३ मे १९१३). राजा हरिश्चंद्रच्या यशाने खर्‍या अर्थाने भारतीय चित्रपटसृष्टीचा एक व्यवसाय म्हणून पाया रचला गेला. या चित्रपटानंतर त्यांनी ‘मोहिनी भस्मासूर’ (१९१३ ), ‘सत्यवान सावित्री’ (१९१४) या चित्रपटांची निर्मिती केली. १९१७ मध्ये त्यांनी ‘लंकादहन’ हा चित्रपट प्रदर्शित केला. अशा या प्रतिभाशाली व्यक्तिमत्वाचे १६ फेब्रुवारी १९४४ रोजी या जगाचा निरोप घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -