घरठाणेठाण्यात घोडबंदरमधल्या हॉटेलला आग, पहाटेपासून दुसरी घटना

ठाण्यात घोडबंदरमधल्या हॉटेलला आग, पहाटेपासून दुसरी घटना

Subscribe

मुंबईच्या धारावीतील कमला नगरच्या झोपडपट्टीला भल्या पहाटेपासून आगीच्या तांडवाने हाहाकार माजवलाय. या आगीच्या ज्वाला आता कुठे शमल्या असतानाच आगीचे सत्र मात्र काही संपण्याचं नाव घेत नाहीय.

मुंबईच्या धारावीतील कमला नगरच्या झोपडपट्टीला भल्या पहाटेपासून आगीच्या तांडवाने हाहाकार माजवलाय. या आगीच्या ज्वाला आता कुठे शमल्या असतानाच आगीचे सत्र मात्र काही संपण्याचं नाव घेत नाहीय. ठाण्यात घोडबंदरमधील एका तळ अधिक एक मजली हॉटेल्सला आग लागल्याची घटना घडली. पहाटेपासून आगीची ही दुसरी घटना आहे.

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाघबीळ नाका या ठिकाणी मे. श्री साई प्युअर व्हेज हे तळ अधिक एक मजली हॉटेल आहे. या हॉटेलला आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग जवळपास सव्वा तासांनी पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. दरम्यान या आगीमुळे हॉटेल्समध्ये अडकलेल्या तिघा कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. त्या कर्मचाऱ्यांमध्ये कोणाच्या हाताला, कोणाच्या चेहऱ्याला आणि डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे.

- Advertisement -
Thane-Ghodbandar-Fire
ठाण्यात घोडबंदरमधील एका तळ अधिक एक मजली हॉटेल्सला आग लागल्याची घटना घडली.

हरीश सालियन यांच्या मालकीचं हे हॉटेल आहे. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी कासारवडवली पोलीस, महावितरण, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दल या विभागांनी ताबडतोब धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.

Thane-Ghodbandar-Fire
ठाण्यात घोडबंदरमधील एका तळ अधिक एक मजली हॉटेल्सला आग लागल्याची घटना घडली.

याचदरम्यान हॉटेलमध्ये अडकलेल्या दीपक दास (३०), अमर देसाई (२८) आणि महेश मोकल (२९) या तिघा कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

- Advertisement -
Thane-Ghodbandar-Fire
या आगीमुळे हॉटेल्समध्ये अडकलेल्या तिघा कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. त्या कर्मचाऱ्यांमध्ये कोणाच्या हाताला, कोणाच्या चेहऱ्याला आणि डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे.

तसंच हॉटेलमधून एकूण ७ कमर्शियल भारत गॅस सिलेंडर व १ डोमेस्टिक भारत गॅस सिलेंडर बाहेर काढून ते अग्निशमन दलाने ताब्यात घेतले. तर जवळपास सव्वा तासांनी आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांना यश आले.

Thane-Ghodbandar-Fire
तसंच हॉटेलमधून एकूण ७ कमर्शियल भारत गॅस सिलेंडर व १ डोमेस्टिक भारत गॅस सिलेंडर बाहेर काढून ते अग्निशमन दलाने ताब्यात घेतले.

यावेळी २ फायर वाहन, २ रेस्क्यू वाहन व १ जम्बो वॉटर टँकर पाचारण करण्यात आले होते. जखमी झालेल्या हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये दीपक यांच्या हाताला, अमर यांच्या चेहऱ्याला आणि महेश यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -